‘हे’ आहे जगातील सर्वात दुःखी शहर; का आहेत इथले लोक उदास?

3

नुकतीच आनंदी देशांची यादी समोर आली आहे. आज आम्ही तुम्हाला जगातल्या अत्यंत दुःखी शहराबद्दल सांगणार आहोत. रशियाच्या नॉरिल्स्क या शहरातली ही कथा. या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे यास ‘मोस्ट डिप्रेसिंग सिटी’ म्हणजेच ‘सर्वात दुःखत शहर’ असं म्हणतात.

हे शहर पूर्व रशियाच्या क्रास्नोयार्स्क क्राय क्षेत्रात वसलेलं आहे. हे शहर इतकं खराब आहे की, या शहरात रस्ते देखील नाहीत. या शहरात जाण्याची हिंमत कुणीच करत नाही. या शहरात सुमारे १ लाख ७० हजार घरे आहेत. हवाई मार्गाने हे शहर जोडले आहे.

हे शहर पृथ्वीवरील निकेल-कॉपर-पॅलेडियमच्या सर्वात मोठ्या साठ्याजवळ आहे. या खनिजांच्या उत्खननातून शहराला पैसा मिळतो. शहरातील बहुतेक लोक नोरिल्स्क निकेलसाठी काम करतात. इथल्या लोकांचे मासिक उत्पन्न ९८६ अमेरिकन डॉलर एवढे आहे. निकेल प्लांटमधून २० लाख टनांहून अधिक विषारी वायू बाहेर पडतात. यामुळे रासायनिक बरसात होते आणि पाणी देखील प्रदूषित होतं. प्रदूषणामुळे नोरिल्स्कमध्ये वाहणाऱ्या डल्डिकेन नदीचा रंग गडद लाल झाला आहे. जणू ही रक्ताची नदी आहे.

प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याचा रंग लाल झाला असल्याचे समोर आले आहे. इथल्या लोकांचे आयुर्मान सुमारे ५९ वर्षे आहे. अशा अनेक कारणांमुळे या शहराला जगातलं सर्वात जास्त दुःखी शहर म्हटलं जातं.

(हेही वाचा – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वकिलांना काळ्या कोटापासून सूट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.