World Cup 2023 : विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून सुरुवात; गुगलकडून खास शुभेच्छा

130
World Cup 2023 : विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून सुरुवात; गुगलकडून खास शुभेच्छा

आजपासून म्हणजेच ५ ऑक्टोबर पासून क्रिकेट विश्वातील सर्वांत मोठ्या स्पर्धेला म्हणजेच (World Cup 2023) वर्ल्ड कप २०२३ ला सुरुवात होत आहे. भारत चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारताने यापूर्वी १९८७, १९९६, आणि २०११ या वर्षी वर्ल्ड कपचे यजमान पद भूषवलं. क्रिकेट विश्वातल्या सर्वांत प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी रोहित शर्माचा संघ (World Cup 2023) पूर्णपणे सज्ज झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर (World Cup 2023) गुगलनेही खास डुडल (Google Doodle) तयार करून आपण देखील विश्वचषकासाठी तयार असल्याचे सांगत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

New Project 2023 10 05T083642.161

गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची (World Cup 2023) सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. आज दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

(हेही वाचा – Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरला ईडीचे समन्स; ६ ऑक्टोबरला होणार चौकशी)

आकडेवारीनुसार, आतापर्यंत वनडेमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड (World Cup 2023) यांच्यात ९५ सामने झाले आहेत. त्यामध्ये इंग्लंडने ४५ तर न्यूझीलंडने ४४ सामने जिंकले आहेत. आहे. चार सामन्याचा निकाल लागला नाही, दोन मॅच ड्रॉ झाल्या. त्यामुळेच इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी ४७.३६ इतकी आहे. तर किवीची टक्केवारी ४६.३१ इतकी आहे. म्हणजेच इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.