What Next For Rohit? मुंबई इंडियन्सने जे केलं ते बीसीसीआय करेल का?

रोहित शर्माचं आता भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान काय?

163
What Next For Rohit? मुंबई इंडियन्सने जे केलं ते बीसीसीआय करेल का?
What Next For Rohit? मुंबई इंडियन्सने जे केलं ते बीसीसीआय करेल का?
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्माचं आता भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान काय? (What Next For Rohit?)

सध्या भारतीय क्रिकेटचा एक काळ गाजवलेल्या दोन खेळाडूंच्या मनात पुढे काय या प्रश्नाने घर केलं असणारए आणि या प्रश्नाचं उत्तर त्या दोघांना आपलं आपण शोधण्याची मुभा नाहीए. बीसीसीआय, भारतीय संघाची नवीन उभारणी, क्रिकेटचे जागतिक दूत ही त्यांची असलेली ओळख असे अनेक कांगोरे या प्रश्नाला आहेत. प्रश्नचिन्ह उभी करणारी आणि आपल्याला प्रश्नात पाडणारी ही व्यक्तिमत्त्व आहेत रोहित शर्मा आणि विराट कोहली. (What Next For Rohit?)

एक मात्र नक्की की, या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली आहे. अलीकडेच मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील फ्रँचाईजीने आपल्या पुरता हा प्रश्न सोडवला आहे. त्यांनी १० वर्षं संघाचं यशस्वी नेतृत्व केलेल्या रोहित शर्माकडून कप्तानी काढून घेऊन ती हार्दिक पांड्याला दिली. (What Next For Rohit?)

आणि हा निर्णय जाहीर करताना फ्रँचाईजीने अधिकृतपणे हे स्पष्ट केलं की, ‘हा निर्णय भविष्यातील आराखडे बांधून घेतलेला आहे. म्हणजे रोहित हा संघाचा फॉरेव्हर कप्तान आहे. पण, नवीन नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने हार्दिककडे सूत्र देण्यात आली आहेत.’ (What Next For Rohit?)

(हेही वाचा – Mission Lakshyavedh : खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार- संजय बनसोडे)

युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी रोहित हवा संघात

बारकाईने बघितलं तर भारतीय राष्ट्रीय संघातही ती वेळ आलेली आहे. ३६ वर्षांचा रोहित टी-२० क्रिकेटला लागणारा वेगवान न्याय देऊ शकेल का आणि क्रिकेटचे तीनही प्रकार इथून पुढे खेळू शकेल का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे भारतीय संघ जूनमधील टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची उभारणी करत असताना त्यात रोहित आणि विराटचं स्थान काय, ते आहे की नाही, यावर चर्चा आणखी जोराने सुरू झाली आहे. (What Next For Rohit?)

काहींना वाटतं फक्त अनुभव आणि क्षमता यांच्या जोरावर इतर युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी रोहित संघात हवा. तसंच विराटच्या बाबतीतही लोकांना वाटतं. आयोजकांना हे दोन्ही खेळाडू हवेच असणार कारण ते आहेत म्हणून स्पर्धेचा ब्रँड तयार होतो आणि लोकप्रियता मिळते. (What Next For Rohit?)

(हेही वाचा – India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका १७ डिसेंबरपासून सुरू, वेळापत्रक जाणून घ्या…)

नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे

एक मतप्रवाह असाही आहे की, आता नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, जे आधीपासून संघाचा दरवाजा ठोठावत आहेत. नवीन खेळाडूंच्या फिअरलेस, बेधडक क्रिकेटची टी-२० ला आता गरज आहे. खुद्द रोहीत आणि विराटनेही विश्वचषकानंतर टी-२० आणि एकदिवसीय अशा दोन्ही मालिकांपासून दूर राहणं पसंत केलं आहे. पण, ते खरंच त्यापासून कायमचं दूर राहतील का, आयोजक आणि बीसीसीआय त्यांना पूर्णवेळ दूर राहू देतील का असाही एक प्रश्न आहे. (What Next For Rohit?)

दोघांची टी-२० खेळण्याची इच्छा नाहीए असं आता तरी दिसतंय. विराटने तर आयपीएलमध्येही रॉयल चॅलेंजर्स संघाची कप्तानी सोडली आहे. पण, २०२८ मध्ये टी-२० क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये जाणार आहे तेव्हाचा ब्रँड अँबेसिडर विराट कोहली आहे, हे आता ठरलंय. अशावेळी त्याला इतकं सहजासहजी टी-२० विश्वचषकापासून दूर ठेवता येणार आहे का? (What Next For Rohit?)

(हेही वाचा – Dharavi Redevelopment MP Shewale : उध्दव ठाकरेंचा धारावीच्या पुनर्विकासात खोडा, पण दादरकरांच्या घरांसाठी कधी काढणार मोर्चा खासदार शेवाळेंचा सवाल)

काय आहे बीसीसीआयच्या मनात? 

या बाबतीत बीसीसीआयच्या मनात नेमकं काय आहे? खेळाडूंना नेमकं काय वाटतंय? (What Next For Rohit?)

यात आणखी एक मेख आहे. आता रोहित आणि विराट टी-२० पासून दूर आहेत. पण, आगामी कसोटी मालिका आणि त्यानंतरची आयपीएल दोघांनी गाजवली. तर बीसीसीआयचं धोरण नेमकं काय असेल? आयपीएलमधील फॉर्म वरून दोघांच्या टी-२० खेळण्याचा निर्णय होणार आहे का? (What Next For Rohit?)

असे अनेक प्रश्न सध्या या दोघांच्या भोवती घोंघावत आहेत आणि उत्तरं फक्त येणारा काळच देऊ शकणार आहे. (What Next For Rohit?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.