
-
ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक आणि ऊर्जावान खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीबाबत(Virat Kohli Aggression)माजी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. विराटच्या सामन्यांमध्ये पंचगिरी करण्याचा अनुभव सांगताना चौधरी म्हणाले की, विराट कधी कधी मैदानावर आक्रमक प्रतिक्रिया देतो, परंतु त्याच्या मनात कोणाविषयीही कटुता किंवा द्वेष नसतो. त्याची आक्रमकता ही केवळ स्पर्धात्मक वृत्तीचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Virat Kohli Aggression)
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चौधरी यांनी सांगितले की, त्यांना विराट लहानपणापासून परिचित आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव आणि मैदानावरील वागणूक जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. विराट एखाद्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देतो, परंतु पंचांचा निर्णय योग्य असल्याचे त्याला पटले, तर तो त्याचा आदरही करतो.(Virat Kohli Aggression)
चौधरी म्हणाले, “विराट कधी कधी आक्रमक प्रतिक्रिया देतो, पण तुम्ही योग्य निर्णय दिला असेल तर तो तुम्हाला अंगठा दाखवून कौतुकही करतो. दोन षटकांच्या दरम्यान तो येऊन सहजपणे संवाद साधतो. तो सतत उत्साही असतो. त्याच्यासारखे खेळाडू क्रिकेटमध्ये असणे आवश्यक आहे, अन्यथा खेळ नीरस होईल.”(Virat Kohli Aggression)
(हेही वाचा – Land Survey : ‘एकदाच केलेली जमीन मोजणी, कायमस्वरुपी वैध!’ राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा? )
आयपीएलमधील विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील २०१३ मधील प्रसिद्ध वादाचा उल्लेख करत चौधरी यांनी सांगितले की, उत्तर भारतातील अनेक खेळाडू नैसर्गिकरित्या आक्रमक शैलीत क्रिकेट खेळतात. ही आक्रमकता त्यांच्या कामगिरीतूनही दिसून येते. मात्र या आक्रमकतेलाही मर्यादा असली पाहिजे आणि ती कधीही शिस्तीच्या पलीकडे जाऊ नये, असे त्यांनी नमूद केले.(Virat Kohli Aggression)
चौधरी यांच्या मते, क्रिकेटमध्ये भावनिक अभिव्यक्ती, ऊर्जा आणि स्पर्धात्मकता यामुळेच खेळ अधिक रंजक बनतो. खेळाडूंवर अतिप्रमाणात निर्बंध घातल्यास क्रिकेटची रंगत कमी होऊ शकते. विराट कोहली हा मैदानावर भावना व्यक्त करणारा खेळाडू असला, तरी तो खेळाचा आणि पंचांचा आदर करणारा क्रिकेटपटू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Virat Kohli Aggression)
सध्या विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर विश्रांती घेत असून, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. चौधरी यांच्या वक्तव्यामुळे विराटच्या आक्रमक प्रतिमेचा एक वेगळा पैलू समोर आला असून, त्याच्या स्पर्धात्मक वृत्तीबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे.(Virat Kohli Aggression)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
