Virat Kohli 50th Century : विराटच्या शतकानंतर पत्नी अनुष्का शर्माची अशी होती प्रतिक्रिया, व्हीडिओ व्हायरल

विराट कोहली या विश्वचषकात इतका फॉर्ममध्ये आहे की, ४९ आणि ५० वं शतक त्याने तीन सामन्यांतच केलं. आणि ५० वं शतक झालं तेव्हा त्याची पत्नी अनुष्का स्टेडिअममध्ये हजर होती 

61
Virat Kohli 50th Century : विराटच्या शतकानंतर पत्नी अनुष्का शर्माची अशी होती प्रतिक्रिया, व्हीडिओ व्हायरल
Virat Kohli 50th Century : विराटच्या शतकानंतर पत्नी अनुष्का शर्माची अशी होती प्रतिक्रिया, व्हीडिओ व्हायरल

ऋजुता लुकतुके

विराट कोहलीने आपलं ५० वं शतक (Virat Kohli 50th Century) साजरं केलं, त्यानंतर एक गोष्ट मीडियाशी बोलताना तो आवर्जून म्हणाला, ‘माझं शतक बघायला दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकर आणि पत्नी अनुष्का हजर होते, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.’ पत्नी अनुष्काही त्या क्षणानंतर भावूक झाली होती. विराट विरुद्ध पहिल्याच चेंडूवर पायचीचचं अपील झालं आणि ते तिसऱ्या पंचांनी फेटाळलं, तेव्हाही अनुष्काचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिने सुटकेचा नि:श्वास टाकलेला स्पष्ट दिसला.

त्यानंतर विराटने आधी शुभमन गिल आणि त्यानंतर श्रेयस अय्यरबरोबर भागिदारी रचत भारतीय धावसंख्या चारशेच्या जवळ आणली. आणि स्वत:चं ५० वं एकदिवसीय शतक पूर्ण केलं. हे शतक पूर्ण झाल्यावर विराटने कमरेत झुकून त्याने ज्याचा विक्रम मोडला त्या सचिन तेंडुलकरला मानवंदना दिली.

(हेही वाचा-Rajnath Singh 10 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला राहणार उपस्थित)

त्यानंतर त्याची मान वळली ती पत्नी अनुष्का शर्माकडे. अनुष्का भावनातिरेकाने त्याला ‘फ्लायिंग किस’ देत होती. विराटनेही तिला तसाच प्रतिसाद दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

विराटचं या विश्वचषकातील हे तिसरं शतक होतं. आणि ११३ चेंडूंमध्ये ११७ धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकार ठोकले. विराट कोहलीने आता एकदिवसीय कारकीर्दीत २९१ सामन्यांमध्ये ५० शतकं आणि ७१ अर्धशतकांच्या जोरावर १३,७९४ धावा केल्या आहेत त्या ५८ धावांच्या सरासरीने.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तो तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.