Mumbai Airport : दिवाळीत विक्रमी उड्डाणे, दर दीड मिनिटाला उड्डाण किंवा लँडिंग सुरूच

61
Mumbai Airport : दिवाळीत विक्रमी उड्डाणे, दर दीड मिनिटाला उड्डाण किंवा लँडिंग सुरूच
Mumbai Airport : दिवाळीत विक्रमी उड्डाणे, दर दीड मिनिटाला उड्डाण किंवा लँडिंग सुरूच

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्वाधिक विमान वाहतूक हाताळणीचा विक्रम केला आहे. दिवाळीदरम्यान ११ नोव्हेंबर, २०२३ रोजी दिवसभरात १,०३२ विमानांची ये-जा या विमानतळावर झाली. या दिवशी प्रत्येक तासाला एकूण ४३ विमानांनी उड्डाण व लँडिंग केले. केले. म्हणजेच दर सव्वा ते दीड मिनिटांत एका विमानाने एकतर उड्डाण तरी वा लँडिंग तरी केले. या विमानतळाने डिसेंबर २०१८चा स्वत:चाच सर्वाधिक प्रवासीसंख्येचा विक्रम मोडला. (Mumbai Airport)

मुंबई विमानतळावरून हे नेहमीच या व्यस्त विमानतळ म्हणून ओळखले जाते. मुंबईत दिवसाकाठी ९५० च्या आसपास विमान वाहतूक होते. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना आपल्या फेऱ्या वाढवण्यास अनुमती दिल्यामुळे आता विमान वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. तर ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान एकूण २,८९३ विमानांची वाहतूक झाली. २,१३७ विमानांनी देशांतर्गत प्रवासासाठी उड्डाण केले तर ७५७ विमानांनी परदेशासाठी उड्डाण केले. तीन लाख ५४ हजार ५४१ लोकांनी देशांतर्गत प्रवास केला.एक लाख ६२ हजार २३१ प्रवासी परदेशात रवाना झाले. (Mumbai Airport)

तर वाहतूक आणखी वाढली असती!
मुंबईमध्ये जरी दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना समांतर नाहीत. त्या अधिक चिन्हाप्रमाणे एकमेकांना छेदून जातात. त्यामुळे एकाचवेळी विमानाचे लँडिंग किंवा उड्डाण शक्य नाही. जर मुंबई विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या असत्या तर मुंबईची विमान वाहतूक आणखी वाढली असती.

(हेही वाचा : Mumbai Trans Harbour Link : २० मिनिटात मुंबईतून नवी मुंबई करा सुस्साट प्रवास)

मिळालेल्या माहितीनुसार ११ ते १३ नोव्हेंबर अशा दिवाळीच्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येने पाच लाख १६ हजार ५६२ प्रवाशांसह नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यापैकी ११ नोव्हेंबर या एका दिवशी मुंबई विमानतळावर तब्बल १,०३१ विमानांची वाहतूक नोंदली गेली. २०१८ साली मुंबई विमानतळावर १,००४ असा विमान वाहतुकीचा उच्चांक नोंदला गेला होता. तो उच्चांक या नव्या वाहतुकीच्या आकड्यांनी मोडला आहे. दिल्लीनंतर मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असून सणासुदीच्या हंगामाखेरीज दिवसाकाठी येथून ९५० पेक्षा जास्त विमानांची वाहतूक होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.