Virat Kohli 50th Century : विराट कोहली आता रिकी पाँटिंगला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेट मधील तिसरा यशस्वी फलंदाज 

विराट कोहली त्याच्या कारकीर्दीच्या अशा उंबरठ्यावर आहे, जिथे तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला की नवा विक्रम होतो. आताही ५० व्या शतकाबरोबरच विराटने आणखी काही विक्रमांना गवसणी घातली आहे 

135
Virat Kohli 50th Century : विराट कोहली आता रिकी पाँटिंगला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेट मधील तिसरा यशस्वी फलंदाज 
Virat Kohli 50th Century : विराट कोहली आता रिकी पाँटिंगला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेट मधील तिसरा यशस्वी फलंदाज 

ऋजुता लुकतुके

भारत वि. न्यूझीलंड उपान्त्य सामन्या दरम्यान विराट कोहलीने आपलं ५०वं एकदिवसीय शतक (Virat Kohli 50th Century) साजरं केलं. ११३ चेंडूंत ११७ धावा करताना विराटने भारताला ४०० च्या जवळ न्यायलाही मदत केली. त्याचवेळी एकदिवसीय क्रिकेटमधील आणखी काही विक्रम नावावर केले.

विराट कोहलीने मुंबईत रिकी पाँटिंगच्या एकदिवसीय क्रिकेटमधील १३,७०४ धावांना मागे टाकलं. त्याबरोबरच विराट आता या प्रकारातील तिसरा यशस्वी फलंदाज झाला आहे. विराटं अर्धशतक पूर्ण झालं तेव्हाच विराटने पाँटिंगला मागे टाकलं.

(हेही वाचा-Mumbai Trans Harbour Link : २० मिनिटात मुंबईतून नवी मुंबई करा सुस्साट प्रवास)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या शर्यतीत सगळ्यात वर आहे सचिन तेंडुलकर. त्याने एकूण १८,४२६ एकदिवसीय धावा केल्या आहेत. तर श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहेत १४,२३४ धावा. विराट कोहलीच्या आता १३,७९४ धावा झाल्या आहेत. म्हणजे संगकाराला मागे टाकण्यासाठी त्याला अजून २४० धावांची गरज आहे.

त्याचबरोबर विराटने या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक ७११ धावा केल्या आहेत. १० सामन्यांमध्ये सातशेच्या वर धावा करताना त्याने २ शतकं आणि ५ अर्धशतकं ठोकली आहेत. तर त्याची धावांची सरासरी आहे १०८ धावांची. भारतातर्फे एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याची कामगिरीही विराटने केली आहे. यासाठी त्याने सचिनच्या ७०३ धावांचा विक्रम मागे टाकला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पहिले पाच फलंदाज पाहूया…

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.