Virat Kohli 50th Century : सुनील गावसकर यांच्यापासून नोवाक जोकोविचपर्यंत सगळ्यांनी केलं विराटचं कौतुक 

विराट कोहलीचं ५० वं एकदिवसीय शतक साजरं झालं तेच मूळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटलमास्टर सुनील गावसकर यांच्या उपस्थितीत. आणि या शतकानंतर विराटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय 

96
Virat Kohli 50th Century : सुनील गावसकर यांच्यापासून नोवाक जोकोविचपर्यंत सगळ्यांनी केलं विराटचं कौतुक 
Virat Kohli 50th Century : सुनील गावसकर यांच्यापासून नोवाक जोकोविचपर्यंत सगळ्यांनी केलं विराटचं कौतुक 

ऋजुता लुकतुके

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवरील वातावरण काही काळ विराटमय झालं होतं. उपान्त्य सामना विसरून क्षणभर अख्खं क्रिकेट विश्व विराट कोहलीच्या ५० व्या शतकाचा (Virat Kohli 50th Century) आनंद साजरा करत होतं. विराटने मूळात शतक केलं तेच साक्षात सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांच्यासमोरच. सुनील गावसकर समालोचन कक्षात हजर होते.

तिथे बोलताना ते म्हणाले, ‘सचिनने भारतीय क्रिकेटचा मापदंड उंचावला आहे. विराट तर सुपरह्‌युमन आहे. त्याने हे मापदंड कुठल्या कुठे नेले आहेत.’ सुनील यांच्याच भावना इतर माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या आहेत. विराटने आपलं पन्नासावं शतक बुधवारी साजरं केलं ते १०५ चेंडूंमध्ये. त्याने ११३ चेंडूंमध्ये एकूण ११७ धावा केल्या त्या २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने.

त्याचा विक्रम पूर्ण झाल्यावर टेनिसमधील गोट म्हणजे ग्रेट ऑफ ऑल टाईम्स असलेल्या नोवाक जॉकोविचने सर्वप्रथम विराटचं अभिनंदन केलं. आपल्या ट्‌विटर अकाऊंटवर जॉकोविच लिहिलो, ‘विराटचं अभिनंदन. ही खूप मोठी कामगिरी आहे!’

विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकात फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले आहेत. सध्या तो सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहे या स्पर्धेतील. तर भारतातर्फे एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आता त्याच्या नावावर आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्याबाबतीत तो आता रिकी पाँटिंगच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सुनील गावसकर यांनीही विराटच्या सातत्याचं कौतुक केलं आहे. ‘विराट ज्या पद्धतीने धावा करतोय ते विलक्षण आहे. सात दिवसांपूर्वी त्याने ४९ वं शतक केलं होतं. (Virat Kohli 50th Century) मध्ये खेळलेले दोन डावही अर्धशतकी आहेत. आणि आता लगेचच ५० वं शतक केलं आहे.  हे विलक्षण आहे,’ असं गावसकर स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी बोलताना म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.