राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण

150

कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये सर्वच क्रीडा स्पर्धा बंद झाल्या होत्या, अशा परिस्थितीमध्ये सुमारे अडीच वर्षानंतर एज्युकल स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे (EduCul Sports Foundation) बॅडमिंटनच्या खेळाच्या स्पर्धा २२ जून २०२२ ते २६ जून २०२२ या कालावधीत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा अंतिम सोहळा रविवार, २६ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता.

( हेही वाचा : ‘या…मला अटक करा!’ ईडीच्या समन्सनंतर राऊतांनी केले ट्वीट)

या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि एकूण ८०४ स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये नोंदणी केली होती. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे प्रेसिडेंट अरूण लखानी यांनी या स्पर्धेकरता विशेष शुभेच्छा दिल्या होत्या तसेच यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक मुंबईत दाखल झाले होते. स्पर्धेचा प्रतिसाद लक्षात घेऊन आयोजकांनी ही स्पर्धा ३ ठिकाणी ८ बॅडमिंटन कोर्टवर एकाचवेळी आयोजित केली होती.

New Project 1 21

याठिकाणी झाली स्पर्धा

१) जुहू विलेपार्ले जिमखाना, जुहू ,
२) शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल (अंधेरी क्रीडा संकुल)
३) अंधेरी रिक्रिएशन क्लब.

या स्पर्धेचा अंतिम सोहळा रविवार २६ जून रोजी सायंकाळी पार पडला. विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे प्रेम शुक्ला (भाजप राष्ट्रीय प्रवक्ता), विकास महानते ( कलाकार), सचीन गुंजाल (अथर्व बिल्डर, विलेपार्ले) यांच्या हस्ते १ लाख ५८ हजार रुपयांची बक्षिसे वितरीत करण्यात आली.

विजेत्यांची नावे

13 वर्षांखालील मुले एकेरी
  • विजेता – सिद्धार्थ हेगडे
  • उपविजेता – प्रतिमा मनिहार
13 वर्षांखालील मुली एकेरी
  • विजेती – मधुरा काकडे
  • उपविजेता – रुतू किटलेकर
15 वर्षांखालील मुले एकेरी
  • विजेता – देव रुपारेलिया
  • उपविजेता – तनय मेहेंदळे
15 वर्षांखालील मुली एकेरी
  • विजेती – युतिका चव्हाण
  • उपविजेता – इव्हाना त्यागी
पुरुष एकेरी
  • विजेता – दीप रांभिया
  • उपविजेता – हर्ष शर्मा
महिला एकेरी
  • विजेता – सिया बंग
  • उपविजेती – श्रुती फणसे
पुरुष दुहेरी
  • विजेता – विराज कुवळे व विप्लव कुवळे
  • उपविजेता – दीप रांभिया आणि अनिरुद्ध मयेकर
महिला दुहेरी
  • विजेते – महेक नायक आणि अनामिका सिंग
  • उपविजेते – प्रिशिता सिन्हा आणि शिवानी हेर्लेकर
मिश्र दुहेरी
  • विजेते – दीप रांभिया आणि प्राजक्ता सावंत
  • उपविजेते – सिद्धेश राऊत आणि अनघा करंदीकर
35+ महिला दुहेरी
  • विजेते – पूजा खांडेकर आणि स्वप्नल चक्रवर्ती
  • उपविजेते – अजिता रवींद्रन आणि सरिता जेठवानी
४५+ पुरुष दुहेरी
  • विजेते – निरंजन शहाणे आणि राघव भोसले
  • उपविजेते – जॉर्ज कोशी आणि राजेश भानुशाली
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.