T20 World Cup, Ind vs Pak : हरभजनच्या तिखट उत्तरानंतर कामरान अकमलची सपशेल माफी

अवमानजनक वक्तव्यानंतर कामरान अकमलने मागितली अर्शदीप आणि हरभजनची जाहीर माफी

172
T20 World Cup, Ind vs Pak : हरभजनच्या तिखट उत्तरानंतर कामरान अकमलची सपशेल माफी
T20 World Cup, Ind vs Pak : हरभजनच्या तिखट उत्तरानंतर कामरान अकमलची सपशेल माफी
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने (Kamran Akmal) शिख धर्मीयांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर आता जाहीरपणे माफी मागितली आहे. भारत – पाक (Ind vs Pak) सामन्यानंतर भारतीय खेळाडू अर्शदीपला त्याने मारलेला टोमणा त्याच्या अंगलट आला आहे. भारतीय माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केलीच. पण, हरभजन सिंगने (Harbhajan Singh) कामरानला जळजळीत प्रत्युत्तर दिलं होतं. भारत – पाक (Ind vs Pak) सामन्यानंतर एआरवाय वृत्त वाहिनीवर कामरानने केलेलं विधान हे खोडसाळपणाचं, अवमानकारक आणि अयोग्य असल्याचं मत पाकिस्तानमध्येही उमटलं होतं. (T20 World Cup)

भारत – पाक (Ind vs Pak) सामन्यात अर्शदीपने विसावं षटक टाकलं. या षटकापूर्वी वातावरणाचं वर्णन करताना कामरानने म्हटलं होतं की, ‘कुछ भी हो सकता है………बारा बजने वाले है!’ सगळ्यात आधी स्वत: शीख असलेल्या हरभजनने (Harbhajan Singh) या विधानाला उत्तर दिलं. अकमलचा (Kamran Akmal) व्हीडिओ शेअर करत हे अयोग्य असल्याचं हरभजनने म्हटलं होतं. त्यावर अखेर कामरान अकमलने सोशल मीडियावर नवीन ट्विट करत झाल्या प्रकाराची माफी मागितली. (T20 World Cup)

(हेही वाचा – शाळांमध्ये 15 जूनपासून लागू होणार One State One Uniform; काय आहे नवी नियमावली)

‘मी अलीकडे केलेल्या वक्तव्यासाठी मी शीख समुदाय आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांची जाहीर माफी मागतो. मला केलेल्या विधानाचा पश्चाताप होतो आहे. माझे शब्द अवमानकारक आणि अयोग्य होते. जगभरातील शीख समुदायाबद्दल मला आदरच आहे. आणि कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ असं अकमलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Kamran Akmal)

(हेही वाचा – Champions Trophy : चॅम्पियन्स चषकासाठी पाकिस्तानची भारताला लाहोरमध्ये खेळण्याची ऑफर)

कामरानचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हरभजनने आपल्या ट्विटमधून सुरुवातीला तिखट प्रतिक्रिया दिली होती. ‘तुला लाज वाटली पाहिजे कामरान! तू असं काहीतरी बोलण्यापूर्वी शीखांचा इतिहास एकदा बघायला हवा होतास. तुमच्यावर आक्रमण झालं तेव्हा शीखांनी तुमच्या बहिणी आणि मातांना वाचवलं होतं. आणि तेव्हाही बाराच वाजले होते,’ अशा कडक शब्दात हरभजनने अकमलला सुनावलं होतं. (T20 World Cup)

आता अकमलने माफी मागितली असली, तरी क्रिकेट समालोचन करताना धार्मिक सलोखा आणि संवेदनशीलता हवी याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. (T20 World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.