शाळांमध्ये 15 जूनपासून लागू होणार One State One Uniform; काय आहे नवी नियमावली

One State One Uniform : विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश घालायचा आहे. तसेच स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी परिधान करावा.

228
शाळांमध्ये 15 जूनपासून लागू होणार One State One Uniform; काय आहे नवी नियमावली
शाळांमध्ये 15 जूनपासून लागू होणार One State One Uniform; काय आहे नवी नियमावली

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत (Samagra Shiksha Abhiyaan) शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा (Marathi School Uniform News) लाभ देण्यात येतो. या शाळांतील विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (One State One Uniform)

विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश घालायचा आहे. तसेच स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी परिधान करावा. मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

कसा असेल आपल्या पाल्याचा यंदाचा गणवेश…

मुलींचा गणवेश

1 ली ते 4 थी

नियमित गणवेश
सोमवार, बुधवार व शुक्रवार
पिनो फ्रॉक : गडद निळ्या रंगाचा फ्रॉक, आकाशी रंगाच्या बाह्या

स्काऊट गाईड गणवेश
मंगळवार, गुरूवार व शनिवार
ओव्हरऑल फ्रॉक : रंग गडद निळा

इयत्ता 5 वी

नियमित गणवेश
सोमवार, बुधवार व शुक्रवार
स्कर्ट-टॉप : आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट

स्काऊट व गाईड गणवेश
मंगळवार, गुरुवार व शनिवार
ओव्हरऑल फ्रॉक : रंग गडद निळा

6 वी ते 8 वी आणि 1 ली ते 8 वी (ऊर्दू माध्यम)

नियमित गणवेश
सोमवार, बुधवार व शुक्रवार
सलवार – कमीज : आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी

स्काऊट व गाईड गणवेश
मंगळवार, गुरुवार व शनिवार
सलवार – कमीज : गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी

मुलांचा गणवेश

1 ली ते 7 वी

नियमित गणवेश
सोमवार, बुधवार व शुक्रवार
हाफ पॅन्ट आणि शर्ट : आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट

स्काऊट व गाईड
मंगळवार, गुरुवार व शनिवार
हाफ पॅन्ट आणि शर्ट : स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट

8 वी नंतरची मुले

नियमित गणवेश
सोमवार, बुधवार व शुक्रवार
फुल पॅन्ट आणि शर्ट : आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट

स्काऊट व गाईड
मंगळवार, गुरुवार व शनिवार
फुल पॅन्ट आणि हाफ शर्ट : स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट (One State One Uniform)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.