Champions Trophy : चॅम्पियन्स चषकासाठी पाकिस्तानची भारताला लाहोरमध्ये खेळण्याची ऑफर

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे.

113
Champions Trophy : चॅम्पियन्स चषकासाठी पाकिस्तानची भारताला लाहोरमध्ये खेळण्याची ऑफर
Champions Trophy : चॅम्पियन्स चषकासाठी पाकिस्तानची भारताला लाहोरमध्ये खेळण्याची ऑफर
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) स्पर्धेवरून भारत आणि पाकिस्तान देशाची क्रिकेट मंडळं सध्या एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. ही स्पर्धा पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे. आणि पाकिस्तानला भारतीय संघ पाठवण्यासाठी बीसीसीआय तयार नाही. म्हणजे पाकला संघ पाठवण्यासाठी केंद्रसरकारची परवानगी लागेल, असं सध्या बीसीसीआयने म्हटलं आहे. स्पर्धा यशस्वी होण्याच्या दृष्टीने अर्थातच भारताचा सहभाग महत्त्वाचा असल्याने पाकिस्तानने भारतासमोर एक पर्याय ठेवला आहे. भारतीय संघाच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी देऊन भारताचे सर्व सामने लाहोर इथं खेळवण्याची तयारी पाकिस्तानने दाखवली आहे. तसं त्यांनी आयसीसीला पाठवलेल्या प्रस्तावातही नमूद केल्याचं पाक क्रिकेट मंडळातील सूत्रांनी मीडियाला सांगितलं आहे.

गेल्यावर्षी भारतीय संघाने आशिया चषका दरम्यान पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला होता. त्यामुळे भारताचे सामने श्रीलंकेला हलवावे लागले होते. भारत – पाक सामनाही लंकेतच झाला. बीसीसीआयची याविषयीची भूमिका स्पष्ट आहे. ते खेळाडूंना पाकमध्ये खेळायची सक्ती करणार नाहीत. आणि पाकिस्तान दौरा करायचा झाल्यास केंद्रसरकार आणि गृह मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे.

(हेही वाचा – Sachin Tendulkar in the USA : सचिन तेंडुलकर जेव्हा अमेरिकेत बेसबॉल खेळतो…)

पाकिस्तानने एप्रिल २०२४ मध्ये चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) वेळापत्रकाचा प्राथमिक आराखडा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला पाठवला आहे. आणि यात लाहोर बरोबरच रावळपिंडी आणि कराची इथं सामने खेळवण्याचा प्रस्ताव आहे. पण, भारताचे सामने लाहोरमध्येच होतील, असं यात नमूद करण्यात आलंय. १९९६ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर पाकमध्ये आयसीसीची मोठी स्पर्धा झालेलीच नाही. २००८ चा आशिया चषक आणि त्यानंतर २०२३ च्या आशिया चषकाचे काही सामने पाकमध्ये झाले होते. तर इंग्लिश क्रिकेट संघाने एकदा पाकचा दौरा केला आहे.

आंतरराष्ट्रीय संघांनी पाठ फिरवल्यामुळे पाक क्रिकेट मंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलं आहे. आणि चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) सुरळीत पार पाडणं हे त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भारताने पाकिस्तानमध्ये खेळावं, नाहीतर पाकला त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी, अशी पाकिस्तानची आयसीसीकडे मागणी आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.