T20 World Cup 2024 : ‘बुमराहच भारताला टी२० विश्वचषक जिंकून देऊ शकतो,’ – अनिल कुंबळे

बुमराहने पाकिस्तान विरुद्ध १४ धावांत ३ बळी मिळवून भारताला विजय मिळवून दिला

73
T20 World Cup 2024 : ‘बुमराहच भारताला टी२० विश्वचषक जिंकून देऊ शकतो,’ - अनिल कुंबळे
T20 World Cup 2024 : ‘बुमराहच भारताला टी२० विश्वचषक जिंकून देऊ शकतो,’ - अनिल कुंबळे
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाने पहिल्या डावात ११९ धावा करूनही विजय मिळवला. त्यांनी पाकिस्तानला निर्धारित २० षटकांत ७ बाद ११३ धावांवरच रोखलं. आणि यात महत्त्वाची भूमिका बजावली ती तेज गोलंदाज जसप्रीत बुमराहने. (Jasprit Bumrah) आपल्या ४ षटकांत फक्त १४ धावा देत त्याने ३ बळी मिळवले. पॉवर प्लेमध्ये मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी पाकसाठी चांगली सुरूवात केली होती. तिसऱ्या षटकात बुमराह गोलंदाजीला आला आणि त्याने बाबर आझमला बाद केलं. त्यानंतर जम बसलेला रिझवान आणि धोकादायक इफ्तिकारलाही त्याने बाद केलं. हे तीनही बळी मोक्याच्या जागी मिळवत बुमराहने सामन्यावर आपला ठसा उमटवला. त्यामुळेच माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) म्हणतोय, ‘भारताला विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकायचा असेल, तर बुमराहला अशीच कामगिरी करावी लागेल.’

टी-२० क्रिकेटमध्ये (T20 World Cup 2024) आता बुमराहने ६४ सामन्यांमध्ये ७९ बळी मिळवले आहेत. आणि या प्रकारात भारताकडून सर्वाधिक बळींच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचलाय. त्याची बळींची सरासरी आहे १८ धावांची. आणि षटकामागे त्याने फक्त ६.०८ धावा दिल्या आहेत. टी-२० क्रिकेटमधील (T20 World Cup 2024) तो सगळ्याच किफायतशीर गोलंदाज मानला जातो. बुमराहने (Jasprit Bumrah) रविवारी ९४ सामन्यांत ७८ बळी मिळवणाऱ्या हार्दिकला मागे टाकलं. तर भारताकडून सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे तो यजुवेंद्र चहल. त्याच्या नावावर ९४ बळी आहेत. आणि भुवनेश्वर कुमार ९० बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे.

(हेही वाचा – PM Modi Ministries : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी ?)

पाकिस्तान विरुद्ध हार्दिकचा आखूड टप्प्याचा मारा आणि बुमराहची अचूक गोलंदाजी प्रभावी ठरली असं अनिल कुंबळेला (Anil Kumble) वाटतं. ‘बुमराहने (Jasprit Bumrah) घेतलेले बळी मोक्याच्या क्षणी मिळवलेले होते. १५ व्या षटकात रिझवान बाद झाला नसता आणि १९ व्या षटकात त्याने इफ्तिकारला बाद करण्याबरोबरच अचूक गोलंदाजी केली नसती, तर कदाचित सामना भारताच्या हातून निसटला असता. ही दोन षटकं निर्णायक ठरली. आणि अशा खेळपट्टीवर विचारपूर्वक गोलंदाजी करणारा बुमराह सारखाच गोलंदाज हवा,’ असं कुंबळे बुमराचं कौतुक करताना म्हणाला. (Anil Kumble)

पुढे कुंबळे असंही म्हणाला की, बुमराहनेच पहिलं षटक टाकलं पाहिजे. आणि भारताला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जायचं काम बुमराहच करू शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.