T-20 World Cup Controversy : भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमानपद भूषवत असलेल्या आगामी टी-२० विश्वचषकातून बांग्लादेश क्रिकेट संघाने माघार घेतली आहे.(T-20 World Cup Controversy) बांगलादेश संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सहभागी होणार नाही, असे सरकारने जाहीर केले आहे. आयसीसीने सामने हलविण्यास नकार दिल्याने बांग्लादेशने मोठा निर्णय जाहीर केला आहे. बांगलादेश सरकारने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, बांगलादेश क्रिकेट संघ २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळणार नाही. भारतात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी दिली.(T-20 World Cup Controversy)
(हेही वाचा T-20 World Cup Controversy : वादाला नवे वळण! वर्ल्डकप खेळण्याचा निर्णय बांगलादेशने खेळाडूंवर सोपविला )
बांगलादेश सरकारने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की बांगलादेश क्रिकेट संघ २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळणार नाही. बांगलादेश संघाने टी-२० विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारने म्हटले आहे की आयसीसीने टी-२० विश्वचषकाचे सामने हलविण्याची त्यांची मागणी फेटाळली आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला(आयसीसी) देखील लक्ष्य केले आहे. अलीकडेच, बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी सांगितले की, बांगलादेशी खेळाडू टी-२० विश्वचषकात खेळू इच्छितात, परंतु संघ त्यांचे सामने फक्त श्रीलंकेत खेळेल.(T-20 World Cup Controversy)
Join Our WhatsApp Community

