Shubman Gill : गुजरात टायटन्सचा कर्णधार झाल्यावर शुभमनची पहिली प्रतिक्रिया 

120
Shubman Gill : गुजरात टायटन्सचा कर्णधार झाल्यावर शुभमनची पहिली प्रतिक्रिया 
Shubman Gill : गुजरात टायटन्सचा कर्णधार झाल्यावर शुभमनची पहिली प्रतिक्रिया 

ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या २०२४ हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. खेळाडूंच्या लिलावापूर्वी काही महत्त्वाचे संघ बदल सोमवारी जाहीर झाले आहेत. आणि यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सनी विकत घेतलं आहे. हार्दिकच्या जागी संघ व्यवस्थापनाने शुभमन गिलची (Shubman Gill) नवा कर्णधार म्हणून नियुक्तीही केलीय. २३व्या वर्षी कर्णधारपदाची माळ गळ्यात पडल्यामुळे गिल खूश तर आहेच. आणि सोशल मीडियावरही त्याने हा आनंद व्यक्त केला आहे.

‘गुजरात टायटन्स सारख्या संघाचं कर्णधारपद मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. इतक्या कसलेल्या संघाचा कर्णधार बनवताना जो विश्वास संघ व्यवस्थापनाने माझ्यावर दाखवला आहे, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे,’ असं शुभमनने(Shubman Gill)  ट्टिवरवर लिहिलं आहे.

गुजरात टायटन्सकडून गिलने मागचे (Shubman Gill) दोन हंगाम गाजवले आहेत. एकूण ३३ डावांमध्ये त्याने १,३७३ धावा केल्या आहेत त्या ५९ धावांच्या सरासरीने. यात ३ शतकं आणि ८ अर्धशतकं आहेत. २०२३ चा हंगाम तर त्याच्यासाठी खास महत्त्वाचा ठरला. यात त्याने १७ सामन्यांत ८९० धावा केल्या. गेल्या हंगामातील सर्वोत जास्त धावांसाठीची ऑरेंज कॅपही त्यालाच मिळाली होती.

आयपीएलमधील दोन हंगामातच गिलच्या नावावर दोन महत्त्वाचे आयपीएल विक्रम आहेत. प्ले-ऑफमध्ये त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध केलेली ६० चेंडूंत १२९ धावांची खेळी ही प्ले-ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. तर एकाच हंगामात तीन शतकं ठोकण्याची कामगिरीही त्याने केली आहे. या बाबतीत विराट कोहली, जोस बटलर यांच्या तो मागे आहे. या दोघांनी एका हंगामात ४ शतकं ठोकली आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.