Shoaib Malik Marries Again : सानिया मिर्झाबरोबर वेगळं झाल्यावर शोएब मलिक पाक अभिनेत्रीशी विवाहबद्ध

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा इस्लामिक ‘खुला’ या रीतीने घटस्फोट झाल्याचं मिर्झाच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे.

219
Shoaib Malik Marries Again : सानिया मिर्झाबरोबर वेगळं झाल्यावर शोएब मलिक पाक अभिनेत्रीशी विवाहबद्ध
Shoaib Malik Marries Again : सानिया मिर्झाबरोबर वेगळं झाल्यावर शोएब मलिक पाक अभिनेत्रीशी विवाहबद्ध
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री साना जावेद बरोबर विवाह झाल्याचं शनिवारी सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. शोएबला सानिया मिर्झापासून एक मुलगा आहे. शनिवारी त्याने साना जावेदबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतात, ‘आम्ही तुम्हाला जोडीने बनवलं आहे,’ असा संदेश त्यावर लिहिला आहे. (Shoaib Malik Marries Again)

सानिया आणि शोएबचा मुलगा पाच वर्षांचा आहे. आणि त्याचं नाव इझान असं आहे. तो सध्या हैद्राबादला त्याची आई सानिया मिर्झाबरोबर राहतो. २०२२ पासून सानिया आणि शोएब यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या अधून मधून चर्चेला येत होत्या. (Shoaib Malik Marries Again)

(हेही वाचा – ‘विस्थापित’ Bachchu Kadu मराठा आंदोलनातून ‘प्रस्थापित’ होणार?)

‘खुला’ या मुस्लीम रितीप्रमाणे घटस्फोट

मागची काही वर्षं सानिया आणि शोएब कुठल्याही कार्यक्रमात एकत्र दिसलेले नाहीत. सानिया हैद्राबादला तिच्या जुन्या घरीच राहतेय. आणि अलीकडेच शोएबने सानियाला इन्स्टाग्रामवरही अनफॉलो केलं होतं. आता सानियाच्या निकटवर्तीयांनी तिच्या आणि शोएबच्या घटस्फोटाला दुजोरा दिला आहे. ‘खुला’ या मुस्लीम रितीप्रमाणे त्यांचा घटस्फोट पार पडल्याचं निकटवर्तीयांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. या पद्धतीत पत्नीला घटस्फोट हवा असतो. आणि ती तो काझींकडे मागू शकते. (Shoaib Malik Marries Again)

एप्रिल २०१० मध्ये सानिया आणि शोएब मलिक यांचा विवाह झाला होता. आणि त्यानंतर दोघं दुबईत राहत होते. गेल्यावर्षीपर्यंत सानिया टेनिसमध्येही सक्रिय होती. तिने जवळ जवळ २० वर्षांच्या कारकीर्दीत ४३ डब्ल्यूटीए दुहेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. (Shoaib Malik Marries Again)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.