Kolkata येथील BJP Office बाहेर सापडली बॉम्बसदृश वस्तू; भाजप नेते म्हणतात, हे बंगालमध्येच का ?

128
Kolkata येथील BJP Office बाहेर सापडली बॉम्बसदृश वस्तू; भाजप नेते म्हणतात, हे बंगालमध्येच का ?
Kolkata येथील BJP Office बाहेर सापडली बॉम्बसदृश वस्तू; भाजप नेते म्हणतात, हे बंगालमध्येच का ?

पश्चिम बंगालमधील (West Bengal) कोलकाता (Kolkata) येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर (BJP Office) रविवार, 16 जून रोजी बॉम्बसारखी वस्तू सापडली. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अनिल शर्मा आणि एसपी अतुल सिंग यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

(हेही वाचा – PUNE: बकरी ईदनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, ‘या’ परिसरातील रस्ते बंद राहणार)

कोलकाता पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “माहेश्वरी हाऊसच्या बाहेर सापडलेली संशयास्पद वस्तू बॉम्ब नाही. पोलिसांनी असा दावा केला की, तो बॉम्ब नव्हता, तर ती बाँम्बसदृश दिसणारी गोल वस्तू होती. घटनास्थळी श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. बॉम्ब निकामी करणारे पथकही दाखल झाले होते.

निवडणुकीनंतरच बंगालमध्ये हिंसाचार का होतो ?

निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील अहवाल देण्यासाठी भाजपची समिती कोलकाता येथे पोहोचली. भाजप नेते रवीशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी या प्रकरणानंतर बंगालच्या कायदा-सुव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, ‘मला एकच गोष्ट सांगायची आहे, देशभरात निवडणुका (Loksabha Election 2024) होतात, निवडणुकीनंतरच बंगालमध्ये हिंसाचार का होतो ? ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळीही हिंसाचार झाला. आज पुन्हा बॉम्ब सापडला आहे. देशभरात निवडणुका झाल्या आणि कुठेही असा हिंसाचार झाला नाही. आमचे कार्यकर्ते का घाबरले आहेत ? ही अतिशय गंभीर बाब आहे आणि जर ममता बॅनर्जी यांचा लोकशाहीवर विश्वास असेल, तर त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.