T20 World Cup : भारतीय संघावर चौफेर टीका; सचिनने टीकाकारांना सुनावले! म्हणाला, एका पराभवामुळे…

136

टी२० विश्वचषकात भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यामुळे टीम इंडियावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. हा पराभव इतका लाजिरवाणा होता की भारताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. यामुळे आता भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरने टीम इंडियाची बाजू घेतली आहे.

( हेही वाचा : प्रतापगड झाला! आता मलंगगडासह कुलाबा, लोहगड, विशाळगडावरील थडग्यांवर कारवाई कधी?)

एका पराभवामुळे भारतीय संघ वाईट ठरत नाही!

सचिन म्हणाला, मला माहिती आहे की इंग्लंडविरुद्ध भारताचा झालेला पराभव खूपच निराशजनक होता, मी देशवासीयांच्या भावनांचा सन्मान करतो पण भारताने कित्येक वेळा अविस्मरणीय विजय मिळवले आहेत, त्यामुळे एका पराभवाच्या आधारे तुम्ही भारतीय संघाचे मोजमाप करू नका. आपण जगातील नंबर वन टी२० संघ राहिलेले आहोत, दीर्घकाळ प्रयत्न केल्यावर आपल्याला ती उंची गाठता येते. त्यामुळे एका पराभवामुळे भारतीय संघ वाईट ठरत नाही असे मत त्याने व्यक्त केले.

सचिनने टीकाकारांना सुनावले 

ओव्हलच्या मैदानात १६८ ही धावसंख्या समाधानकारक नव्हती, त्यात गोलंदाजांनी अधिक निराशा केली. भारतीय संघाची कामगिरी चांगली नव्हतीच परंतु कोणताच खेळाडू खराब खेळायचं म्हणून मैदानावर उतरत नाही. तो जिंकण्याच्या हेतूनेच मैदानात खेळतो. आपण प्रत्येकवेळी विरुद्ध संघाला पराभूत करू शकत नाही. केव्हा वेळ ही समोरच्या संघाची सुद्धा असते असे म्हणत सचिनने टीकाकारांना उत्तर देत भारतीय संघाची पाठराखण केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.