Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडच्या फजितीवर चाहत्यांचा मिम्सचा पाऊस 

भारतीय संघ जोहानसबर्गमध्ये असताना ऋतुराज गायकवाड बरोबर एक मजेशीर फजितीचा प्रसंग घडला. तो व्हीडिओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांनी त्यावर मिम्स सुरू केली आहेत 

375
Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडच्या फजितीवर चाहत्यांचा मिम्सचा पाऊस 
Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडच्या फजितीवर चाहत्यांचा मिम्सचा पाऊस 

ऋजुता लुकतुके

जोहानसबर्ग इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड बरोबर एक मजेशीर प्रसंग घडला. सामना संपल्यानंतर संघाच्या बसकडे ऋतुराज जात होता. तो दाराजवळ पोहोचलाही. पण, अचानक स्वयंचलित दरवाजा बंद झाला. त्यामुळे ऋतुराजला काही काळ बाहेरच थांबावं लागलं.

एकतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आणि त्यावर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया आणि मिम्सही येत आहेत.

ऋतुराज पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही झटपट बाद झाला. त्यावर एका चाहत्याने लिहिलंय की, ‘ऋतुराजच्या खराब प्रदर्शनामुळे कर्णधार के एल राहुलने त्याला बसमध्ये घेतलं नाही.’

ऋतुराज गायकवाड पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ वर तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४ धावा करून बाद झाला. कसोटी संघात ऋतुराजला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चमक दाखवण्यासाठी त्याच्याकडे पर्लच्या सामन्यात शेवटची संधी आहे. दरम्यान मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ अशा बरोबरीत आहेत. तिसरा सामना २१ तारखेला पार्ल इथं होणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.