Mumbai : ती चौदाव्या मजल्यावरून पडली आणि …कुटुंबियांच्या काळजात झाले धस्स

कुर्ला येथे १४ व्या मजल्यावरुन पडूनही मुलीला हाताला किरकोळ जखम

454
Mumbai : ती चौदाव्या मजल्यावरून पडली आणि ...कुटुंबियांच्या काळजात झाले धस्स
Mumbai : ती चौदाव्या मजल्यावरून पडली आणि ...कुटुंबियांच्या काळजात झाले धस्स

‘देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कुर्ल्यात एक 13 वर्षीय मुलगी थेट चौदाव्या मजल्यावरून खाली पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या हाताला फक्त किरकोळ दुखापत वगळता कोणतीही मोठी इजा झाली नाही आणि तिचा जीव वाचला आहे. (Mumbai)

सखीरा शेख (Sakhira shekh)(१३) असे या मुलीचे नाव असून ति तिच्या कुटुंबासह कुर्ला नेहरूनगर येथील मिडासभूमी हारमनी या सतरा मजली इमारतीमध्ये चौदाव्या मजल्यावर राहते. १० डिसेंबरला तिचा वाढदिवस होता. तिला मिळालेल्या भेटवस्तू बघण्यात ती मग्न होती. सखीरा ही घराच्या खिडकीजवळ खेळत होती. आणि ते बघता बघता अचानक खिडकीतून तिचा तोल गेला आणि चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली.(Mumbai)

(हेही वाचा : Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडच्या फजितीवर चाहत्यांचा मिम्सचा पाऊस )

मात्र ती कोसळत असताना झाडांच्या फांद्या आणि इमारतीखालील शेडच्या पत्र्याला धडकुन खाली कोसळली. यावेळी तिच्या घरच्यांच्या काळजात धस्स झाले. ते इमारतीच्या खाली आले असतं त्यांना तिला पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. तिला केवळ हाताला किरकोळ दुखापत झाली होती मात्र ती सुरक्षित होती. तिला सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.