Rohit, Virat to Rest : श्रीलंका दौऱ्यावरही रोहित, विराट जाणार नाहीत?

भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम बघून हा निर्णय होण्याची शक्यता आहे

120
Rohit, Virat to Rest : श्रीलंका दौऱ्यावरही रोहित, विराट जाणार नाहीत?
Rohit, Virat to Rest : श्रीलंका दौऱ्यावरही रोहित, विराट जाणार नाहीत?
  • ऋजुता लुकतुके

सध्या सुरू असलेल्या झिंबाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. आणि इथं दोन्ही संघ एकदिवसीय क्रिकेटची मालिका खेळणार आहेत. पण, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या दोघांना इथंही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर जसप्रीत बुमराही या दौऱ्यावर जाणार नाही. (Rohit, Virat to Rest)

भारतीय संघाचा त्यानंतरचा कार्यक्रम व्यस्त आहे. आणि संघाला आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. आणि ते पाहता, दोघांना विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआय घेऊ शकतं. तसं झालं तर हार्दिक पांड्या किंवा के एल राहुल यांच्यापैकी एकाला नेतृत्व दिलं जाईल. (Rohit, Virat to Rest)

(हेही वाचा – Mumbai Universityच्या सर्व परीक्षा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलल्या, नवीन तारखा लवकरच जाहीर होणार)

रोहित मागचे सहा महिने सातत्याने क्रिकेट खेळतोय. आणि ऑगस्टच्या लंका दौऱ्यानंतर भारतीय संघाचा पुढील कार्यक्रम व्यस्त आहे. तर विराट कोहलीही (Virat Kohli) नवीन हंगामासाठी तयार होण्यापूर्वी आपली पत्नी आणि मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी लंडनला गेला आहे. ‘भारताच्या एकदिवसीय संघांचा विचार झाला तर दोघांची संघातील जागा पक्की आहे. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकापूर्वी दोघांनी इंग्लंड विरुद्धची मालिका खेळली तरी तेवढा सराव त्यांना पुरेसा आहे. उलट न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिका खडतर आहेत. तिथे दोघांना शंभर टक्के योगदान देता यावं, यासाठी बीसीसीआयने दोघांना लंका दौऱ्यासाठी सुटी द्यायचं ठरवलं आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. (Rohit, Virat to Rest)

श्रीलंका दौरा संपल्यावर भारतीय संघ बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळणार आहे. ती संपल्यावर इंग्लंड बरोबरची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. तिथून लगेचच चॅम्पियन्स करंडक स्पर्धाही व्हायची आहे. हा व्यस्त कार्यक्रम पाहता, भारतीय संघातील खेळाडूंना आवश्यक तिथे विश्रांती देण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असेल. (Rohit, Virat to Rest)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.