Mumbai Universityच्या सर्व परीक्षा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलल्या, नवीन तारखा लवकरच जाहीर होणार

मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

118
Mumbai Universityच्या सर्व परीक्षा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलल्या, नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
Mumbai Universityच्या सर्व परीक्षा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलल्या, नवीन तारखा लवकरच जाहीर होणार

मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील मंगळवारी (९ जुलै २०२४) होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखा लवकरच जाहीर होतील, असे मुंबई विद्यापीठाने म्हटले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच मुंबईमध्ये मागील २४ तासांमध्ये कुलाबा येथे ८३.८ मिमी पाऊस झाला तर सांताक्रूझ येथे २६७.९ मिमी इतका मुसळधार पाऊस झाला आहे. यासोबतच सोमवारी (८ जुलै) सायंकाळी साडेपाचपर्यंत कुलाबामध्ये १०१.८ तर सांताक्रूझमध्ये १४.१ मिलीमीटर पावसाने हजेरी लावली आहे.

(हेही वाचा – रशियन सैन्यात भरती झालेले भारतीय सुखरूप मायदेशी परतणार, Narendra Modi पुतीन यांच्याकडे मुद्दा मांडताना म्हणाले…)

मुंबईतील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर
मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी (९ जुलै) जिल्ह्यातीस सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबरच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.