RBI Governor on Crypto : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा क्रिप्टोला विरोध कायम

जागतिक स्तरावर क्रिप्टोमधील गुंतवणूक आणि या चलनाचा वापर यांवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

88
RBI Governor on Crypto : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा क्रिप्टोला विरोध कायम
RBI Governor on Crypto : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा क्रिप्टोला विरोध कायम

 – ऋजुता लुकतुके

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governor on Crypto ) शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी मध्यवर्ती बँकेची क्रिप्टो चलनावरील भूमिका इतक्यात बदलणार नाही, असं स्पष्ट केलंय

देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेची क्रिप्टो चलनाविषयीची भूमिका इतक्यात बदलणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. जागतिक स्तरावर क्रिप्टोमधील गुंतवणूक आणि या चलनाचा वापर यांवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे निर्बंध आणून आणि त्यावर सरकारी नियंत्रण आणून एकप्रकारे हे चलन मान्य करण्याचाच हा प्रयत्न आहे.

याउलट भारतात क्रिप्टोच्या वापरावर अजूनही बंदी आहे. क्रिप्टोतून कमावलेल्या नफ्यावर मात्र सरकारने कर लावला आहे. त्यामुळे क्रिप्टोविषयी भारतीय मध्यवर्ती बँकेची भूमिका काहीशी संदिग्ध आहे. क्रिप्टोचा चलन म्हणून वापर मात्र भारतात होत नाही.

देशातील क्रिप्टो एक्सचेंज चालवणाऱ्या संस्थांना सरकार क्रिप्टोवर नियमावली आणेल आणि त्या निमित्ताने क्रिप्टोचा वापर नियमित करेल अशी आशा आहे. पण, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सरकारची भूमिका बदलणार नाही, असं निक्षून सांगितलं आहे.

(हेही वाचा – Ind vs Nzl : रोहित शर्मा युवा शुभमन गिलला देतोय न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्याचा मंत्र )

‘क्रिप्टोच्या वापरात प्रचंड मोठी जोखीम आहे. अनेक आंतरराष्ट्रीय अहवालांनी ती अधोरेखित केली आहे. त्यामुळे आमची त्याविषयीची भूमिका बदलणार नाही. सरकारी नियंत्रण म्हणाल तर ते शून्य ते दहा अशा पट्टीवर असू शकतं. शून्य म्हणजे कसलंच नियंत्रण नाही. आणि दहा म्हणजे क्रिप्टोवर बंदीच आहे. या दहा अंशांमध्ये तुम्ही कुठे आहात यावर सगळं अवलंबून आहे,’ असं शक्तिकांत दास म्हणाले. नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेत ते बोलत होते.

वैयक्तिकरित्या दास यांनी यापूर्वी अनेकदा क्रिप्टोवर सरसकट बंदी घालण्याचं मत बोलून दाखवलं आहे. तर रिझर्व्ह बँकेनं क्रिप्टो असेट्स म्हणजे मालमत्तेवर कर लादला असला तरी क्रिप्टो व्यवहारांना मान्यता दिलेली नाही. अलीकडे जी२० देशांच्या अर्थमंत्री स्तरावर झालेल्या परिषदेत जवळ जवळ सगळ्याच देशांनी क्रिप्टोवर बंदी घालण्याच्या विरोधात मत व्यक्त केलं होतं.

त्यामुळे भारतातही क्रिप्टो गुंतवणूकदार आणि एक्सचेंज मालक सरकार काही नियमावली आणून क्रिप्टो व्यवहार नियमित करेल अशा आशेवर होते. पण, शक्तिकांत दास यांच्या ताज्या वक्तव्यानंतर त्यावर पाणी फिरलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.