Ajit Pawar : ध्वनिवर्धकविरहित मिरवणुका काढाव्यात, गणेश मंडळांना अजित पवारांचा इशारा

प्रदूषणामुळे आजार, साथी सुरू होतात. रुग्णांच्या संख्या वाढतात.

20
Ajit Pawar : ध्वनिवर्धकविरहित मिरवणुका काढाव्यात, गणेश मंडळांना अजित पवारांचा इशारा
Ajit Pawar : ध्वनिवर्धकविरहित मिरवणुका काढाव्यात, गणेश मंडळांना अजित पवारांचा इशारा

गणेश विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिवर्धकांच्या (डीजे) आवाजामुळे काहींचे कान बहिरे झाले, तर काहींना ह्रदयविकाराचा धक्का बसला. लेझर बिममुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा होते. यावर्षी गणपती विसर्जनादरम्यान अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे ध्वनिवर्धकविरहित मिरवणुका काढाव्यात. नाईलाजास्तव याविषयी कठोर कायदा करायला भाग पाडू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना दिला आहे.

अजित पवार यावेळी म्हणाले की, वाढत्या प्रदूषणाला आपण जबाबदार आहोत. जबाबदारीचे भान कोणाच्या लक्षात येत नाही. प्रदूषणामुळे आजार, साथी सुरू होतात. रुग्णांच्या संख्या वाढतात. ग्लोबल वार्मिंगचे संकट दारावर आले आहे याशिवाय पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा. पाण्याची बचत करावी. अपव्यय टाळावा.

(हेही वाचा : Match against Bangladesh : रोहित शर्मा खरंच २०० किमी प्रतीतास वेगाने त्याची लँबॉर्गिनी चालवत होता का?)

देशात नरेंद्र मोदी यांच्याशिवाय मजबूत नेतृत्व आपल्यापुढे नाही. त्यांच्याकडे विकासाची दिशा आहे. देशाला जगामध्ये एका महत्वाच्या स्थानावर पोहोचविले आहे. जगातील अनेक देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. महायुती सरकारमध्ये काम करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आहे. विचारांशी प्रतारणा, ध्येय-धोरणांशी तडजोड होणार नाही, हे कटाक्षाने पाहता असतो.

अजित पवार गटातर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि गौरीगणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण आकुर्डीत झाले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.