Match against Bangladesh : रोहित शर्मा खरंच २०० किमी प्रतीतास वेगाने त्याची लँबॉर्गिनी चालवत होता का?

रोहितला जी पावती देण्यात आली ती आता सोशल मीडियावर फिरतेय.

22
Match against Bangladesh : रोहित शर्मा खरंच २०० किमी प्रतीतास वेगाने त्याची लँबॉर्गिनी चालवत होता का?
Match against Bangladesh : रोहित शर्मा खरंच २०० किमी प्रतीतास वेगाने त्याची लँबॉर्गिनी चालवत होता का?
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईहून पुण्याला आला तेव्हा वेगवान गाडी चालवण्यासाठी त्याच्यावर दोन पावत्या फाडण्यात आल्या होत्या, पण त्याच्या गाडीचा वेग तेव्हा नेमका किती होता?

या आठवड्यात बुधवारी म्हणजे १८ ऑक्टोबरला भारतीय कर्णधार रोहित शर्माला वेगाने गाडी चालवल्याबद्दल दंड झाल्याची बातमी सगळीकडे झळकली. रोहित बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईहून पुण्यात गहुंजे इथं आपल्या लाडक्या निळ्या लँबॉर्गिनी गाडीतून येत होता. आणि तेव्हा तो २०० किमी प्रतीतास वेगाने गाडी चालवत असल्याची बातमी तेव्हा पसरली होती.

(हेही वाचा –Ind vs Nzl : रोहित शर्मा युवा शुभमन गिलला देतोय न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्याचा मंत्र )

पण, रोहित खरंच २०० किमी वेगाने गाडी चालवत होता का?

रोहितला जी पावती देण्यात आली ती आता सोशल मीडियावर फिरतेय. आणि यात गाडीचा वेग २०० किमी प्रती तास इतका नाही, तर १०५ आणि ११७ किमी प्रतीतास इतका नोंदवला गेल्याचं दिसतंय. म्हणजे तो २०० किमी प्रतीतास इतका जास्त नव्हता. पुणे पोलिसांनीही नंतर ही गोष्ट स्पष्ट केली आहे.

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर वेगाची मर्यादा १०० किमी प्रतीतास इतकी आहे. पण, ही मर्यादा ओलांडल्याबद्दल रोहीतला दोन प्रसंगांमध्ये २,००० रुपये प्रत्येकी असा एकूण ४,००० रुपये इतका दंड करण्यात आला. आणि गुरुवारी १९ ऑक्टोबरला हा दंड रोहितने भरलाही.

या रस्त्यावर बसवलेल्या कॅमेरांनी रोहीतच्या गाडीचा वेग टिपला आणि त्यानुसार त्याला दंड करण्यात आला. ही दोन्ही दंडाची प्रकरणं १७ ऑक्टोबरची आहेत. पुणे वाहतूक पोलिसांच्या वडगाव शाखेनं या प्रकरणांची नोंद घेतली आहे. आणि त्यानुसार, पहिलं प्रकरण कामशेत बोगद्या जवळचं आहे जेव्हा रोहित मुंबईहून पुण्याला येत होता. आणि तेव्हा त्याची गाडी ताशी ११५ किमी वेगाने जात होती, तर दुसरं प्रकरण सोमाटणे फाट्याजवळचं आहे. तेव्हा त्याची गाडी ११७ किमी वेगाने जात होती. रोहितने ही दंडाची रक्कम भरली आहे. क्रिकेटविषयी सांगायचं झालं तर भारताने पुण्यात झालेला बांगलादेश विरुद्धचा सामनाही आरामात जिंकला आणि यात रोहित शर्माने ४८ धावा करून संघाला चांगली पायाभरणी करून दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.