Rafael Nadal : बार्सिलोना ओपनमध्ये राफेल नदालचं आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात

Rafael Nadal : टेनिस कोर्टावरील पुनरागमनानंतर नदालचा हा दुसराच व्यावसायिक सामना होता. 

76
Rafael Nadal : बार्सिलोना ओपनमध्ये राफेल नदालचं आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात
  • ऋजुता लुकतुके

बार्सिलोना ओपनच्या दुसऱ्या फेरीत राफेल नदालचा (Rafael Nadal) पराभव झाला आहे. पुनरागमनानंतर नदालचा ही पहिलीच स्पर्धा आणि दुसरा व्यावसायिक सामना होता. पण, ॲलेक्स दी मिनॉरने नदालचा ७-५ आणि ६-१ असा पराभव केला. २२ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलेला नदाल अजूनही पुरेसा तंदुरुस्त नाही. पण, या स्पर्धेत नदालने निकराचा प्रयत्न केला. पहिल्या सेटमध्ये त्याने ५-५ अशी बरोबरीही मिळवली होती. पण, अखेर जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेला दी मिनॉर अखेर त्याला भारी पडला. (Rafael Nadal)

३७ वर्षीय नदाल २०२३ चा जवळ जवळ संबंध हंगाम दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने २०२४ च्या जानेवारीत पुनरागमनाचा एक प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन इथं वर्षातील पहिली स्पर्धा खेळताना त्याला पुन्हा पायाच्या स्नायूचा त्रास सुरू झाला आणि त्याला उपउपांत्य फेरीत माघार घ्यावी लागली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याचं नदालचं स्वप्न भंगलं होतं. (Rafael Nadal)

(हेही वाचा – IPL 2024, RCB Campaign Derailed : बंगळुरू संघाने ११ फलंदाज घेऊन खेळावं, असं ‘या’ माजी क्रिकेटपटूने का सुचवलं?)

नदालने एकूण १४ वेळा जिंकली फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा

त्यानंतर ३ महिन्यांच्या विश्रांतीमुळे तो पुन्हा एकदा खेळायला सिद्ध झाला आहे. यावेळी त्याची नजर असेल ती क्ले कोर्टवरील स्पर्धावर. माँटेकार्लो ही महत्त्वाची स्पर्धा हुकल्यानंतर तो बार्सिलोना ओपनमध्ये आपल्या तंदुरुस्तीची परीक्षा पाहणार होता आणि नदालचा (Rafael Nadal) दुसऱ्या फेरीत पराभव झाला असला तरी त्याने आपली तयारी दाखवून दिली आहे. आता नदालचं लक्ष फ्रेंच ओपन या त्याच्या लाडक्या स्पर्धेकडे असेल. नदालने एकूण १४ वेळा फ्रेंच ओपन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. (Rafael Nadal)

बार्सिलोना ओपनही त्याने यापूर्वी १२ वेळा जिंकली आहे. दी मिनॉर विरुद्धच्या सामन्यापूर्वीच नदालने त्याला खेळणं सोपं जाणार नाही, असं बोलून दाखवलं होतं. सामन्यात पहिल्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी असताना नदालने (Rafael Nadal) सलग १० गुण गमावले आणि पहिला सेटही त्याला गमवावा लागला. त्यानंतर नदालचा खेळही घसरायला सुरुवात झाली. त्यामुळे अजूनही सलग दोन तास खेळण्याची त्याची क्षमता नाही हेच दिसून आलं. (Rafael Nadal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.