गोल्डन बॉयची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी; जागतिक भालाफेक क्रमवारीत नीरज चोप्रा अव्वल स्थानी

25
गोल्डन बॉयची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी; जागतिक भालाफेक क्रमवारीत नीरज चोप्रा अव्वल स्थानी
गोल्डन बॉयची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी; जागतिक भालाफेक क्रमवारीत नीरज चोप्रा अव्वल स्थानी

भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. नीरज १४५५ गुणांसह अव्वल ठरला असून त्याने ग्रॅनाडाच्या जगज्जेता अँडरसन पीटर्स (१४३३) पेक्षा २२ गुणांची आघाडी घेतली. यासह जागतिक ऍथलेटिक्समध्ये पहिल्या स्थानी विराजमान होणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्यामुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

(हेही वाचा – IPL 2023: प्लेऑफमध्ये आरसीबीला टिकून राहण्यासाठी टॉम मूडीचा विराटला महत्त्वाचा सल्ला)

जागतिक ऍथलेटिक्सने सोमवारी नवी क्रमवारी जाहीर केली. त्यात नीरजला १४५५ गुणांसह अव्वल ठरला. दुसऱ्या क्रमांकावर ग्रॅनाडाच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सला १४३३ गुण, तिसऱ्या क्रमांकावर टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा झेक प्रजासत्ताकचा जेकोब वडलेज १४१६ गुण, चौथ्या क्रमांकावर जर्मनीचा ज्युलियन वेबर १३८५ गुण, तर पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा अर्शद नदीम असून त्याला १३०६ गुण आहेत.

नीरजच्या आगामी स्पर्धा

नीरज आपल्या २०२३ च्या हंगामाची सुरुवात दोहा येथे झालेल्या डायमंड लीग चॅम्पियन बनून केली होती. या स्पर्धेत त्याने विक्रमी ८८.६७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. आता नीरजला त्याची पुढची स्पर्धा नेदरलँड्सच्या हेंगलो येथे खेळायची आहे. ही स्पर्धा फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्स असून ती ४ जूनपासून सुरू होईल. यानंतर नीरजला १३ जून रोजी फिनलंडमधील तुर्कू येथे होणाऱ्या पावो नुर्मी गेम्समध्ये आपले कौशल्य दाखवायचे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.