My Name is VVS Laxman : ईशान किशन जेव्हा आपलं नाव व्ही व्ही एस लक्ष्मण असल्याचं सांगतो…

बीसीसीआयने भारतीय संघाचा एक ताजा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि यात इशान किशन बरोबर प्रश्नांची चुकीची उत्तरं देतोय.

80
My Name is VVS Laxman : ईशान किशन जेव्हा आपलं नाव व्ही व्ही एस लक्ष्मण असल्याचं सांगतो…
My Name is VVS Laxman : ईशान किशन जेव्हा आपलं नाव व्ही व्ही एस लक्ष्मण असल्याचं सांगतो…
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयने भारतीय संघाचा एक ताजा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि यात ईशान किशन बरोबर प्रश्नांची चुकीची उत्तरं देतोय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कार्यक्रम जेव्हा भरगच्च असतो, तेव्हा दोन सामन्यांच्या मध्ये मनोरंजनासाठी खेळाडू काही ना काही शोधून काढतात. अशीच एक गंमतशीर व्हीडिओ मुलाखत अक्षर पटेलने घेतली आहे ईशान किशनची. यात ईशानला विचारलेल्या प्रश्नांची त्याने चुकीचीच उत्तरं द्यायची होती. त्याने खरं उत्तर दिलं तर तो हरला, असा दंडक होता.

बीसीसीआयनेही आपल्या अधिकृत पेजवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. यात तुझं नाव काय या प्रश्नाचं उत्तर ईशानने व्ही व्ही एस लक्ष्मण असं दिलं आहे.

ईशानला विचारलेले काही प्रश्न आणि त्याची त्याने दिलेली चुकीची उत्तरं ऐकलीत तर तुमचंही मनोरंजन होईल.

‘तुझं वय काय?’

‘८२’

‘तू कुठला खेळ खेळतोस?’

‘फुटबॉल’

‘सुर्यकुमार यादव कोण आहे?’

‘यष्टीरक्षक फलंदाज’

(हेही वाचा – Raj Thackeray : बाळासाहेबांचे विचार असे म्हणता, मग मराठी पाट्या आणि मशिदींवरील भोंग्यावर का निर्णय होत नाही; राज ठाकरेंनी सरकारला सुनावले)

ईशान किशन सध्या भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी-२० मालिका खेळत आहे. विश्वचषकात फारशी संधी न मिळाल्यामुळे त्याने अलीकडेच दु:ख व्यक्त केलं होतं. पण, या टी-२० मालिकेत मात्र त्याची बॅट तळपतेय आणि पहिल्या दोन्ही सामन्यांत त्याने अर्धशतक ठोकलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.