Maxwell Mocks Virat : ग्लेन मॅक्सवेल जेव्हा विराट कोहलीची नक्कल करतो

चेन्नई सुपरकिंग्ज आणि बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएलला सुरुवात होणार आहे. 

101
Maxwell Mocks Virat : ग्लेन मॅक्सवेल जेव्हा विराट कोहलीची नक्कल करतो
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलचा नवीन हंगाम आता अवघ्या काही तासांवर आला आहे. आणि पहिला मुकाबला चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पी चिदंबरम स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ चेन्नईत असून त्यांच्या सरावादरम्यानचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या गाजतोय तो आहे बंगळुरू संघाच्या सरावा दरम्यानचा. (Maxwell Mocks Virat)

बंगळुरू फ्रँचाईजीचा माजी कर्णधार विराट कोहली दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर परततोय. लंडनहून तो थेट संघामध्ये दाखल झाला. आणि तेव्हापासून रोज तो फलंदाजीचा सराव करतोय. पण, अशा गंभीर सराव सत्रांमध्ये काही हलके फुलके क्षण येतातच. तसाच एक क्षण गुरुवारी बंगळुरूच्या संघात बघायला मिळाला. विराट आणि ग्लेन मॅक्सवेल हे संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत. आणि सरावा दरम्यान इथं मॅक्सवेल विराटच्या फलंदाजीच्या शैलीची नक्कल करताना दिसतोय. (Maxwell Mocks Virat)

आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर झाला आहे. (Maxwell Mocks Virat)

(हेही वाचा – YouTube Disclosure Policy : युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना सावधान, कंपनीची असेल सक्त नजर)

विराट-मॅक्सवेल या फलंदाजांचा खेळ बघण्यासाठी चाहते आतूर

आणि याचा मथळाच असा देण्यात आला आहे की, ‘मॅक्सवेलने केलेली विराटची नक्कल तुम्हाला कशी वाटते, हे आम्हाला ० ते १० अशा गुणवारीनुसार सांगा!’ बंगळुरू संघासाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात सकारात्मक वातावरणात होणार आहे. मागच्या रविवारी त्यांच्या महिला संघाने डब्ल्यूपीएल जिंकली आहे. तर फ्रँचाईजीचं नाव बदलून आता रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू असं झालं आहे, जे पूर्वी बँगलोर होतं. (Maxwell Mocks Virat)

संघाचा पहिला सामना २२ तारखेला चेन्नईला असला तरी २५ मार्चपासून पुढील सलग ३ सामने घरच्या मैदानावर असणार आहेत. आणि तिथेही विराट आणि मॅक्सवेल या संघातील मुख्य फलंदाजांचा खेळ बघण्यासाठी चाहते आतूर आहेत. (Maxwell Mocks Virat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.