Lionel Messi : मेस्सी बनला अमेरिकन लीगमधील सगळ्यात महागडा फुटबॉलपटू

अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमध्ये लिओनेल मेस्सी सर्वात जास्त कमाई असलेला फुटबॉलपटू ठरला आहे.

125
Lionel Messi : मेस्सी बनला अमेरिकन लीगमधील सगळ्यात महागडा फुटबॉलपटू
Lionel Messi : मेस्सी बनला अमेरिकन लीगमधील सगळ्यात महागडा फुटबॉलपटू
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमध्ये लिओनेल मेस्सी सर्वात जास्त कमाई असलेला फुटबॉलपटू ठरला आहे. करारानुसार, मेस्सीला इंटर मियामी संघाकडून २० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतके पैसे मिळतात. अमेरिकन फुटबॉल लीग मेजर लीग सॉकरमध्ये इंटर मियामी संघाबरोबर असलेल्या करारातून लियोनेल मेस्सीला वर्षाला २०.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतके पैसे मिळतात आणि त्यामुळे अमेरिकन लीगमधील तो सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे. (Lionel Messi)

विशेष म्हणजे मेस्सीला एकट्याला मिळणारे पैसे हे लीगमधील तीन संघातील सर्वच्या सर्व खेळाडूंना मिळणाऱ्या एकत्रित पैशापेक्षा जास्त आहेत. ऑरलँडो सिटी रोस्टर या संघातील खेळाडूंच्या एकत्र मोबदल्यापेक्षा मेस्सीला मिळणारी रक्कम दुप्पट आहे. मेस्सीचा इंटर मियामी संघाबरोबरच करार २०२५ पर्यंत आहे आणि यात त्याची कराराची मूळ रक्कम १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. याशिवाय मार्केटिंगचे हक्कं आणि इतर भत्ते मिळून मेस्सीला वार्षिक २२.४ दशलक्ष अमेरिकन डॉलरची हमी संघाकडून देण्यात आली आहे. (Lionel Messi)

(हेही वाचा – Ind vs Ban : रवींद्र जडेजा की के एल राहुल, कुणाचा झेल ठरणार सामन्यात सर्वोत्तम )

सध्या या लीगमध्ये मेस्सीच्या मोबदल्याच्या जवळ जाणारा कुठलाही खेळाडू नाही. पण, टोरँटोचा लॉरेन्‌झो इनसाईन १५.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर सह दुसऱ्या स्थानावर आहे. तर शिकागोचा शेरडन शकिरी ८ लाख अमेरिकन डॉलर सह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर एलए गॅलेक्सीच्या झेवियर हर्नांडेझचा नंबर लागतो. लियोनेल मेस्सी इंटर मियामी संघाकडून आतापर्यंत तीन सामने पूर्णपणे खेळला आहे. यात त्याने २८३ मिनिटं मैदानावर घालवली आहेत आणि यात एक गोलही केला आहे. याशिवाय इंटर मियामी संघाला मेजर लीग सॉकरमध्ये एक विजेतेपद मिळवून देण्यात मेस्सीची भूमिका मोठी होती आणि या स्पर्धेत त्याने १० सामन्यांत ७ गोल केले. (Lionel Messi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.