Krida Mahakumbh : अंतिम सामने बुधवारी मालवणीतील क्रीडा भारती मैदानात

522
Krida Mahakumbh : अंतिम सामने बुधवारी मालवणीतील क्रीडा भारती मैदानात
Krida Mahakumbh : अंतिम सामने बुधवारी मालवणीतील क्रीडा भारती मैदानात

विशेष प्रतिनिधी,मुंबई

छत्रपती श्री शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या संकल्पनेतून शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पारंपारिक क्रीडा महाकुंभ(Krida Mahakumbh) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २६ जानेवारी २०२४ पासून मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी पारंपरिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांचे अंतिम सामने २१ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मंगळवारी आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत दिली.(Krida Mahakumbh)

(हेही वाचा- BMC : शुध्द सांडपाण्याचा वापर पिण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक )

अंतिम सामने मालवणी येथील क्रीडा भारती मैदानात

याबाबत अधिक माहिती देताना मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)  यांनी सांगितले की, बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मल्लखांब, मल्लयुद्ध, लेझीम, लंगडी, रस्सीखेच, कबड्डी, पंजा लढवणे, रस्सीखेच आणि ढोल ताशा या क्रीडा आणि कला प्रकारांचे अंतिम सामने मालवणी येथील ‘क्रीडा भारती मैदान’ येथे संपन्न होणार आहेत.(Krida Mahakumbh)

बुधवारी सांगता सोहळा

स्पर्धेच्या(Krida Mahakumbh) सांगता सोहळ्याला मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोड, ‘क्रीडा भारती’चे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ आणि इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. या सांगता सोहळ्या दरम्यान बुधवारी दुपारी १ वाजता अंतिम सामन्यांना सुरुवात होईल. तर सामन्यांच्या नंतर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मुख्य समारंभ व स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होईल.(Krida Mahakumbh)

पुरस्कार वितरण कार्यक्रमांत पोवाडे

पुरस्कार वितरण समारंभ नंतर सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध संगीतकार व गायक नंदेश उमप हे प्रेरणादायी पोवाडे सादर करतील, अशी ही माहिती पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली असून मुंबईकर नागरिकांनी अंतिम फेरीतील सामान्यांचा आवर्जून आनंद घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.(Krida Mahakumbh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.