इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ मध्ये प्रिन्स यादवने (Prince Yadav) शानदार गोलंदाजी करत पर्पल कॅपची शर्यत अधिक रोमांचक केली आहे. गुरुवारी लखनौ सुपर जायंट्सने (LSG) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) ९ धावांनी पराभव केला, ज्यामध्ये प्रिन्स यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रिन्स यादवने सामन्यात तीन विकेट घेतल्या आणि हंगामातील त्याच्या एकूण विकेट्सची संख्या १६ वर पोहोचली. त्याने सामन्यातील सर्वात मोठा धक्का विराट कोहलीला (Virat Kohli) दिला, ज्याला त्याने दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद केले. (IPL 2026)
१६ विकेट्ससह प्रिन्स आता पर्पल कॅपच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या बरोबरीने कागिसो रबाडा आणि ईशान मलिंगा यांच्याही १६ विकेट्स आहेत, मात्र चांगल्या इकॉनॉमी रेटमुळे प्रिन्स त्यांच्यापुढे आहे. प्रिन्सचा इकॉनॉमी रेट ८.०८ आहे, तर रबाडाचा ९.२३ आणि मलिंगाचा ९.४४ आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत सध्या भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि अंशुल कंबोज (Anshul Kamboj) संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. दोघांच्या नावावर १७-१७ विकेट्स नोंद आहेत. मात्र लखनौविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरला एकही विकेट घेता आली नाही. (IPL 2026)
(हेही वाचा – Nida Khan ला आश्रय देणारा ‘तो’ नगरसेवक कोण? नाशिक पोलिसांकडून एमआयएम नेत्याची चौकशी सुरू)
ऑरेंज कॅपच्या यादीत फारसा बदल नाही
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोणताही मोठा बदल पाहायला मिळाला नाही. विराट कोहली शून्यावर बाद झाल्यामुळे ३७९ धावांसह नवव्या स्थानावर कायम आहे. दरम्यान, मिचेल मार्शने शानदार शतक झळकावत मोठी झेप घेतली. त्याने ५६ चेंडूत १११ धावांची खेळी केली, त्यानंतर त्याच्या एकूण धावा ३६७ वर पोहोचल्या असून तो १२व्या स्थानावर पोहोचला आहे. (IPL 2026)
ऑरेंज कॅपच्या यादीत सध्या हेनरिक क्लासेन ४९४ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्या पाठोपाठ अभिषेक शर्मा ४७५ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय केएल राहुल ४४५ धावांसह तिसऱ्या, ईशान किशन ४०९ धावांसह चौथ्या आणि वैभव सूर्यवंशी ४०४ धावांसह पाचव्या स्थानावर आहेत. (IPL 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

