-
ऋजुता लुकतुके
IPL 2026 सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दमदार पुनरागमन करत आयपीएलमधील विक्रमी नववे शतक झळकावले. रायपूरमध्ये झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना त्याने ६० चेंडूत नाबाद १०५ धावा करत संघाला सहा विकेट्सनी शानदार विजय मिळवून दिला. या विजयामुळे बंगळुरु संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला. (IPL 2026)
या सामन्यात विराटच्या खेळीइतकीच त्याच्या सेलिब्रेशनचीही जोरदार चर्चा झाली. सलग दोन भोपळ्यांनंतर त्याने जेव्हा पहिली धाव घेतली, तेव्हा जोरदार जल्लोष करत त्याने आपला ताण आणि भावना व्यक्त केल्या. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेक चाहत्यांनी “विराटची खरी भूक अजून संपलेली नाही” अशा प्रतिक्रिया दिल्या. (IPL 2026)
(हेही वाचा – Trump China Visit : शी जिनपिंग महान नेता; बिजिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केले कौतुक)
Celebrate every run like Virat Kohli 😅
Updates ▶️ https://t.co/X27WecYjiZ#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvKKR | @imVkohli pic.twitter.com/r23XtyBdNV
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2026
पहिली धाव घेतल्यानंतर विराटने आत्मविश्वासाने फलंदाजी केली आणि कोलकाताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या शतकासह त्याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा स्वतःचाच विक्रम आणखी भक्कम केला. तसेच ख्रिस गेलच्या विक्रमालाही मागे टाकत आणखी एका मोठ्या टप्प्यावर नाव कोरले. शतकाकडे वाटचाल करतानाही विराट वेगळ्याच धुंदीत होता. ९२ धावांवरून त्याने थेट षटकार मारून ९८ चा पल्ला गाठला. आणि या फटक्यावर तो स्वत:च इतका खुश होता की, त्याने खेळपट्टीवर पंजाबी भांगडा सुरू केला. शतकापासून २ धावा दूर असतानाच त्याचं हे नृत्य त्याचा आत्मविश्वास आणि मनमोकळेपणाने खेळण्याची उर्मी दाखवून देत होतं. (IPL 2026)
(हेही वाचा – WhatsApp Incognito Chat : आले नवे फिचर; आता मेटा एआयसोबतची तुमची गुप्त चॅट राहतील अधिक सुरक्षित)
Vintage Kohli,Effortless sixes.
That flick of the wrist shot. Chase master for a reason 🐐 #RCBpic.twitter.com/YUvfYA4xBC— ꜱᴘɪᴅᴇʏツ (@Spidey_RCB) May 14, 2026
एकूणच या सामन्यात विराटचा मूड वेगळा होता. सामन्यानंतर विराटने सांगितले की, सलग अपयशानंतर मनावर दबाव होता, त्यामुळे पहिली धाव घेताच मोठा दिलासा मिळाला. “दडपण हेच प्रेरणा देत असते,” असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या मते, प्रत्येक डाव हा स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची संधी असते आणि त्यामुळेच तो अजूनही प्रत्येक सामन्यात तितक्याच जिद्दीने उतरतो. विराटच्या या खेळीमुळे बंगळुरुचा बाद फेरीचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे. चाहत्यांसाठी मात्र त्याचे शतक आणि पहिल्या धावीनंतरचे भावनिक सेलिब्रेशन हेच या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले. (IPL 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

