-
ऋजुता लुकतुके
राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध एका धावेनं निसटता पराभव झाला. पण, या सामन्यात तात्पुरता कर्णधार रियान परागने ४५ चेंडूंत ९५ धावा करताना आयपीएलच्या इतिहासातील अजोड कामगिरी केली. त्याने सलग सहा चेंडूंवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. दोन षटकांत मिळून त्याने ही कामगिरी केली. अनुभवी मोईन अलीच्या चौथ्या षटकांत त्याने शेवटच्या पाच चेंडूंवर सलग षटकार खेचले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या पुढील षटकात दुसऱ्या चेंडूवर त्याने पुन्हा एकदा चेंडू सीमापार भिरकावला. (IPL 2025, Riyan Parag)
मोईन अलीने तोपर्यंत आपल्या २ षटकांत फक्त १३ धावा दिल्या होत्या. पण, रियान परागने केलेल्या कतलीनंतर त्याचं पृथ:करणच बिघडलं आणि २ षटकांत त्याने ४३ धावा दिल्या. पण, रियानच्या या फटकेबाजीनंतरही राजस्थानचा संघ विजयी होऊ शकला नाही. खुद्द पराग ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि त्यानंतर शिमरॉन हेटमायर (२९), शुभम दुबे (नाबाद २५) आणि जोफ्रा आर्चर (१२) यांनी धावा वाढवण्याचा प्रयत्न केला. तरी शेवटच्या चेंडूंवर विजयासाठी ३ धावा हव्या असताना जोफ्रा आर्चर धावचित झाला आणि राजस्थानची बरोबरीची संधीही गेली. (IPL 2025, Riyan Parag)
(हेही वाचा – Swiggy Genie : स्विगीने आपली जिनी सेवा केली बंद; कुठलीही अधिकृत घोषणा नाही)
त्यापूर्वी रियानने ठोकलेले ६ षटकार पाहूया,
He manifested and did it as he always wanted ❤️🔥
Riyan Parag hit six consecutive sixes 6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣pic.twitter.com/vAu7GiCHVr https://t.co/7wqyewcAdM
— Sanju Samson Fans Page (@SanjuSamsonFP) May 4, 2025
त्यापूर्वी कोलकाता संघासाठी हा सामना करो या मरोचा होता आणि अशा महत्त्वपूर्ण सामन्यात आंद्रे रसेलला सूर गवसला. कोलकाताच्या सर्वच फलंदाजांनी किमान दुहेरी आकडा गाठला आणि त्यातही सलामीवीर गुरबाझच्या ३५ धावा आणि अजिंक्य रहाणेच्या ३० धावा यामुळे संघाने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली होती. पण, मधल्या सत्रात फलंदाज लागोपाठ बाद झाल्यामुळे संघाची अवस्था १३ षटकांत ३ बाद १११ अशी झाली होती. (IPL 2025, Riyan Parag)
पण, एरवी या हंगामात फारशा फॉर्मात नसलेल्या आंद्रे रसेलने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत धावा वाढवल्या. २७ चेंडूंत नाबाद ५७ धावा करत त्याने संघाला दोनशे पार नेलं. त्याने ६ षटकार आणि ५ चौकार लगावले. तर रिंकू सिंगनेही तळाला येत ६ चेंडूंत १९ धावा केल्या. त्याने २ षटकार आणि एक चौकार ठोकला. त्यामुळे कोलकाता संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद २०६ धावा केल्या. आंद्रे रसेललाच त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. (IPL 2025, Riyan Parag)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community