IPL 2024 Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला कर्णधार म्हणून धोनी आणि संघ प्रशासनाने ‘असं’ तयार केलं

94
IPL 2024 Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला कर्णधार म्हणून धोनी आणि संघ प्रशासनाने ‘असं’ तयार केलं
  • ऋजुता लुकतुके

२०२४ च्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्जच्या गोटातून बातमी आली ती म्हणजे कर्णधार धोनी पदावरून पायउतार होतोय. आणि नवीन कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची नियुक्ती करण्यात येतेय. धोनी आपला शेवटचा हंगाम खेळत असल्याची अटकळ सगळ्यांनाच होती. त्यामुळे निर्णय तसा अनपेक्षित नव्हता. पण, तरीही धक्का हा बसलाच. आयपीएलमधील (IPL) पहिल्या सामन्यापासून मात्र ऋतुराजने कर्णधार म्हणून स्वत:चा चांगलाच जम बसवलेला दिसला. मुंबई इंडियन्समध्ये जी गडबड झाली ती चेन्नईत झाली नाही. आणि तेच होतं चेन्नई सुपर किंग्ज प्रशासनाचं नियोजन. (IPL 2024 Ruturaj Gaikwad)

ऋतुराज आणि धोनी यांच्यात कप्तानीवरून फारशी चर्चा झाली नसली तरी नेतृत्व बदलाचं नियोजन एक वर्ष चाललं होतं, असं आता उघड झालं आहे. ऋतुराजने स्वत:च कप्तान म्हणून झालेल्या बढतीची पडद्यामागची कहाणी अलीकडे सांगितली आहे. ‘धोनीबरोबर सखोल चर्चा करण्यासाठी खरंतर वेळच मिळाला नाही. पण, एकदाच आम्ही नेतृत्वाबद्दल बोललो होतो. आणि तेव्हा त्याने हातचं न राखता मार्गदर्शन केलं. तेव्हा संघाचा सराव सुरू होता,’ असं ऋतुराजने कोलकाताबरोबरच्या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. (IPL 2024 Ruturaj Gaikwad)

(हेही वाचा – IPL 2024, Ravindra Jadeja : रवी जाडेजाला ‘क्रिकेट थलपथी’ नाव कंस मिळालं?)

ऋतुराजने कोलकाता विरुद्ध झळकावले अर्धशतक

ऋतुराजला (Ruturaj Gaikwad) तयार करण्यासाठीची दूरदृष्टी मात्र धोनीनेच दाखवली होती. ‘२०२२ मध्ये धोनीने एकदा मला एकट्याला जवळ बोलावून एक गोष्ट सांगितली होती. कदाचित एका वर्षांत नाहीतर त्या नंतरच्या हंगामात तुझ्याकडे चेन्नई संघाचं नेतृत्व येईल. त्यासाठी तू तयार राहा, असं मला धोनीने सांगितलं. आणि मी तयार राहिलो,’ असं ऋतुराज याविषयी बोलताना म्हणाला. (IPL 2024 Ruturaj Gaikwad)

ऋतुराजने या हंगामात आतापर्यंत ४ पैकी ३ सामने संघाला जिंकून दिले आहेत. आणि स्वत:च्या फलंदाजीलाही न्याय दिला आहे. कोलकाता विरुद्ध त्याने अर्धशतक झळकावलं. ‘मी मोकळेपणाने खेळणं पसंत करतो. तीच मोकळीक मी संघातील इतर खेळाडूंनाही देतो. माझे निर्णय मी स्वत: घेतो,’ असं ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) शेवटी सांगितलं. चेन्नई संघाची दूरदृष्टी आणि ऋतुराजवरील विश्वास यामुळे धोनीसारख्या कसलेल्या आणि लोकांच्या मनात अढळ स्थान असलेल्या खेळाडूकडून ऋतुराज नेतृत्वाची धुरा घेऊ शकला. (IPL 2024 Ruturaj Gaikwad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.