IPL 2024, Mayank Yadav : पोटाच्या दुखापतीमुळे मयंक यादव दिल्ली विरुद्धच्या पुढील सामन्याला मुकणार

IPL 2024, Mayank Yadav : मयंक यादवला जवळ जवळ एक आठवडा विश्रांती घेण्यास सांगण्यात आलंय 

111
IPL 2024, Mayank Yadav : पोटाच्या दुखापतीमुळे मयंक यादव दिल्ली विरुद्धच्या पुढील सामन्याला मुकणार
IPL 2024, Mayank Yadav : पोटाच्या दुखापतीमुळे मयंक यादव दिल्ली विरुद्धच्या पुढील सामन्याला मुकणार
  • ऋजुता लुकतुके

आपला वेग आणि अचूकतेनं यंदाची आयपीएल (IPL 2024) आतापर्यंत गाजवणारा लखनौ सुपरजायंट्सचा (Lucknow Supergiants) मयंक यादव (Mayank Yadav) दुखापतीमुळे पुढील सामन्याला मुकणार आहे. पोटाच्या तक्रारीमुळे १२ एप्रिलचा दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाविरुद्धचा सामना तो खेळू शकणार नाही. रविवारच्या गुजरात संघाविरुद्धच्या सामन्यातच मयंक एक षटक टाकून मैदानाबाहेर गेला होता. आणि या एका षटकातही त्याने १३ धावा दिल्या होत्या. (IPL 2024, Mayank Yadav)

(हेही वाचा- Israel-Hamas War: हमासच्या अंताची उलट मोजणी सुरू, बेंजामिन नेत्यानाहू यांनी केली नव्या हल्ल्याची घोषणा)

‘मयंकला पोटात खालच्या बाजूला थोडी सूज जाणवत आहे. त्यामुळे पुढचा एक आठवडा संघाने त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. बाकी तो बरा आहे. या कालावधीत त्याच्या तब्येतीवर लक्ष असेल,’ असं फ्रँचाईजीचे सीईओ विनोद बिश्त यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे. या पत्रकात एका आठवड्याचा उल्लेख असल्यामुळे संघाचा १४ एप्रिलचा सामनाही तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाविरुद्ध आहे. पोटाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी खासकरून तेज गोलंदाजांना जास्त वेळ लागतो. आणि त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीत चेंडू टाकताना पोटाच्या खालच्या बाजूला चांगलाच पीळ बसतो. (IPL 2024, Mayank Yadav)

मयंक या हंगामात ताशी १५० किमीच्या वेगाने चेंडू टाकत आहे. पण, शनिवारी तो जेमतेम १४० किमी वेगाने गोलंदाजी करू शकत होता. त्यातही एका षटकानंतर फिजीओंना मैदानात बोलवून शेवटी तोच मैदानाबाहेर गेला. या स्पर्धेत मयंक आतापर्यंत दोन सामने खेळला आहे. आणि यात त्याने ६ बळी मिळवले आहेत. या हंगामातील आतापर्यंतचा सगळ्यात वेगवान चेंडू (ताशी १५६.४ किमी) त्यानेच टाकला आहे. (IPL 2024, Mayank Yadav)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: मविआच्या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या…)

मयंक यादव (Mayank Yadav) आतापर्यंत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये फक्त एकच सामना खेळू शकला आहे. यंदाचा अख्खा रणजी हंगाम कमरेच्या दुखण्यामुळे त्याचा मैदानाबाहेर गेला आहे. आधीच तेंज गोलंदाज हे दुखापतीसाठी धार्जिणे असतात. त्यातच मयंकला त्याच्य वेगामुळे दुखापतीची जास्त शक्यता आहे. मयंकला अलीकडे झालेली दुखापत ही ज्येष्ठ भारतीय खेळाडूला सरावासाठी नेट्समध्ये गोलंदाजी करताना झाली होती. (IPL 2024, Mayank Yadav)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.