IPL 2024, CSK vs RCB : ‘धोनी कर्णधार नसला तरी ऋतुराजसाठी अनमोल ठेवा असेल’

IPL 2024, CSK vs RCB : धोणीने चेन्नई संघाच्या कप्तानीचा गुरुवारी अचानकच राजीनामा दिला आहे 

105
IPL 2024, CSK vs RCB : ‘धोणी कर्णधार नसला तरी ऋतुराजसाठी अनमोल ठेवा असेल’
IPL 2024, CSK vs RCB : ‘धोणी कर्णधार नसला तरी ऋतुराजसाठी अनमोल ठेवा असेल’
  • ऋजुता लुकतुके

महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आपला धक्कादायक निर्णयांचा सिलसिला यावेळीही कायम ठेवला. आणि आयपीएलचा हा हंगाम सुरू व्हायला फक्त एक दिवस बाकी असताना त्याने अचानक चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या कप्तानीचा राजीनामा दिला. त्याच्या जागी सातत्यपूर्ण धावा करणारा सलामीवीर ऋतुराज गायकवाडकडे (Rituraj Gaikwad) नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. आणि अचानक आलेल्या या बातमीनंतर सगळीकडे याची चर्चा सुरू झाली आहे. (IPL 2024, CSK vs RCB)

(हेही वाचा- Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना…)

चेन्नई संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी तर धोनीचा (MS Dhoni) हा निर्णय संघालाही माहीत नव्हता, या भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. ‘२०२२ मध्ये त्याने एकदा कप्तानी सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण, आम्ही म्हणजे संघ त्यासाठी तयार नव्हता. पण, आताही हा निर्णय कटू असला तरी आम्ही निर्णयासाठी तयार आहोत. धोनी संघात असताना आम्ही नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी प्रयत्न करू.’ असं स्टिफन फ्लेमिंग म्हणाले आहेत. (IPL 2024, CSK vs RCB)

तर संघाबाहेरही सर्वत्र धोनीच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रानेही (Aakash Chopra) धोणीतील नेता तुम्ही काढून घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (IPL 2024, CSK vs RCB)

Insert tweet – https://twitter.com/cricketaakash/status/1770761716197884084

‘अचानक त्याने जाहीर केलं की, तो आता कप्तान नसेल. तो असेच निर्णय घेतो. स्वत:ला पटतील असे. आणि कुठलीही चर्चा सुरू न करता. पण, धोनी (MS Dhoni) आता कप्तान नसला तरी नेतेपण त्याच्या रक्तात आहे. एकदा जो नेता होतो, तो जन्मभर राहतो,’ असं ट्विट आकाश चोप्राने (Aakash Chopra) केलं आहे. (IPL 2024, CSK vs RCB)

(हेही वाचा- Election Commission : ‘विकसित भारताचे संदेश पाठवणे थांबवा’ ; निवडणूक आयोगाने दिले केंद्राला आदेश)

यात धोनीच्या नेतृत्व गुणांचा आदर करण्याची भावना तर होतीच. शिवाय ऋतुराजला (Rituraj Gaikwad) धोनीची (MS Dhoni) अजूनही मदतच मिळेल, असाही विचार असावा. १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघातील एक सदस्य कीर्ती आझाद यांनीही धोनीच्या निवृत्तीनंतर अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. (IPL 2024, CSK vs RCB)

‘धोनी कप्तान नसला तरी त्याच्यासारखा नेता आणि खेळाडू संघात आहे, हा चेन्नई संघ आणि ऋतुराज (Rituraj Gaikwad) यांच्यासाठी अनमोल ठेवा आहे. तो पाठीमागून ऋतुराजला सल्ले देणारच. आणि ते योग्यच आहे. भारतात धोनी इतका क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू नाही,’ असं कीर्ती आझाद यांनी म्हटलं आहे. (IPL 2024, CSK vs RCB)

(हेही वाचा- Kapil Sharma ला मिळाला दोन वर्षापूर्वीच्या प्रकरणात कोर्टाकडून दिलासा; जाणून घ्या काय आहे प्रकरण?)

ऋतुराज (Rituraj Gaikwad) हाच धोनीचा (MS Dhoni) नैसर्गिक वारसदार आहे यावर मात्र क्रिकेट वर्तुळात शंका नाही. त्याने आशियाई क्रीडास्पर्घेत भारतीय संघाला सुवर्ण जिंकून दिलं आहे. (IPL 2024, CSK vs RCB)

Insert tweet – https://twitter.com/ChennaiIPL/status/1770817078552928543

२०१९ च्या लिलावापासून ऋतुराज (Rituraj Gaikwad) चेन्नई संघाबरोबर आहे. आणि गेल्या हंगामात त्याने १३ सामन्यांत ५९० धावाही केल्या होत्या. शिवाय सलामीला जोरदार फलंदाजी करण्याबरोबरच क्रिकेटचं तांत्रिक ज्जानही त्याला आहे. (IPL 2024, CSK vs RCB)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.