IPL 2023 MI vs GT : रोहित शर्मा की हार्दिक पांड्या, कोण गाठणार अंतिम फेरी?

गुजरात टायटन्सने १४ पैकी १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर, मुंबई इंडियन्सने १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत.

166
IPL 2023 MI vs GT : रोहित शर्मा की हार्दिक पांड्या, कोण गाठणार अंतिम फेरी?

यंदाचा आयपीएल (IPL 2023 MI vs GT) हंगाम हा बऱ्याच गोष्टींसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. कधी सामन्यानंतरच्या वादामुळे तर कधी सामन्यातील थरारक खेळीमुळे. अशातच यंदाचा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे.

आयपीएल (IPL 2023 MI vs GT) मध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील क्वालिफायर २ सामना आज म्हणजेच २६ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्सने १४ पैकी १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर, मुंबई इंडियन्सने १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार आणि फायनलचं तिकीट मिळवणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.

(हेही वाचा – गोल्डन बॉयची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी; जागतिक भालाफेक क्रमवारीत नीरज चोप्रा अव्वल स्थानी)

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन :

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय.

इम्पॅक्ट प्लेअर्स :

आकाश मधवाल, रमणदीप सिंह, डेवाल्ड ब्रेविस, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन.

हेही पहा – 

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन :

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद.

गुजरात टायटन्स इम्पॅक्ट प्लेअर्स :

शुभमन गिल, साई सुदर्शन, के.एस. भरत, शिवम मावी, आर.साई किशोर.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.