IOA CEO Appointment : ऑलिम्पिक असोसिएशनला लवकरच नवीन सीईओ मिळेल, पी टी उषा यांना विश्वास

51
IOA CEO Appointment : ऑलिम्पिक असोसिएशनला लवकरच नवीन सीईओ मिळेल, पी टी उषा यांना विश्वास
IOA CEO Appointment : ऑलिम्पिक असोसिएशनला लवकरच नवीन सीईओ मिळेल, पी टी उषा यांना विश्वास

भारताला आता ऑलिम्पिक आयोजनाचं स्वप्न पडू लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष थॉमस बाख यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही भारताच्या या इच्छेविषयी बोलून दाखवलं आहे. पण, भारताच्या या इच्छेसाठी अडसर आहे तो भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अटी पाळण्याचा. (IOA CEO Appointment)

आधी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूकच काही वर्षं झाली नव्हती. त्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पी टी उषा यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आली. पण, असोसिएशनला अजून सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारीच नाही आहे.आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेची वार्षिक कार्यकारिणी बैठक अलीकडे मुंबईत झाली. तेव्हा अध्यक्ष थॉमस बाख यांनीही नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवलं. त्यानंतर आता ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी यावर तोडगा काढण्यात पुढाकार घ्यायचं ठरवल आहे. इतर सदस्यांनी साथ दिली तर सीईओची नियुक्ती प्रक्रिया लवकरच पार पाडू. कारण, ते झाल्याशिवाय ऑलिम्पिक आयोजनाचं घोडं पुढे सरकणारच नाही. आणि आंतरराष्ट्रीय नियम आपल्याला पाळावेच लागतील. तेव्हा सहकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढू,’ असं पी टी उषा मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

(हेही वाचा : Navaratri 2023 : गुजरातमध्ये गरबा खेळताना २४ तासांत १० जणांचा हार्टअटॅकने मृत्यू)

२०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक असल्यांच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रसरकार स्वत: पुढाकार घेऊन त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आयोजनासाठी प्रयत्न करायचा झाल्यास काही गोष्टींची पूर्तता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनलाही करावी लागेल. सीईओ नियुक्ती ही त्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. कारण, सीईओ पदावरील व्यक्ती पूर्णवेळ असोसिएशनच्या कामासाठी वाहून घेत संघटनेचा कारभार पाहात असते. आणि दैनंदिन कारभार तसंच महत्त्वाच्या स्पर्धा आयोजनातही त्यांची भूमिका महत्त्वाची असते. यापूर्वी जानेवारी महिन्यात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने या पदाच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. पण, या पदावरील व्यक्तीचे अधिकार आणि कामकाजाचं स्वरुप काय असावं यावर संघटनेतील सदस्यांचं एकमत झालं नाही. आणि त्यामुळे नियुक्ती रखडली ती रखडलीच. आता प्राधान्यक्रमाने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं पी टी उषा यांनी ठरवलंय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.