Health Tips : फ्रीजमध्ये चुकूनही ठेऊ नका ‘ही’ फळे, पोषक तत्वे होतील कमी

89
Health Tips : फ्रीजमध्ये चुकूनही ठेऊ नका 'ही' फळे, पोषक तत्वे होतील कमी
Health Tips : फ्रीजमध्ये चुकूनही ठेऊ नका 'ही' फळे, पोषक तत्वे होतील कमी

ऑफिसला जाणाऱ्या महिला किंवा गृहिणी बाजारातून एकदाच आठवड्यासाठी लागणाऱ्या भाज्या आणि फळे घरी घेऊन येतात. फळे, भाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्यांना फ्रीजमध्ये ठेवले जाते. पण फळे फ्रीजमध्ये ठेवणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहे का? जाणून घेऊयात. (Health Tips )

फ्रीज आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. दैनंदिन जीवनात एकाचवेळी अनेक कामे करण्याची आपल्याला सवय असते. अनेकवेळा एकाच दिवशी फळे आणि भाज्या घरी आणून फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. पण काही फळे फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही.

फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशातच काही फ्रीजमध्ये ठेवलेली काही फळे खाणे आरोग्याच्या दृष्टिने घातक आहेत. कारण फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पौष्टिक गुणधर्म नष्ट होतात आणि मग ती फळे खाण्याचा काहीच फायदा आरोग्याला होत नाही.

(हेही वाचा : BJP : तरुणांची दिशाभूल करणाऱ्या उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी माफी मागावी – भाजपची मागणी)

‘ही’ फळे चुकूनही फ्रीजमध्ये ठेऊ नका –

१. केळे – केळी कधीच फ्रीजमध्ये ठेऊ नका. असे केल्यास केळी लवकर काळी पडू शकतात आणि खराब होतात. केळ्यांमधून इथाईलीन नावाचा गॅस निघतो यामुळे त्यासोबत ठेवलेली दुसरी फळे देखील लवकर पिकतात.

२. सफरचंद – सफरचंद हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि पौष्टिक फळ आहे. सफरचंदाचे सेवन केल्याने डॉक्टरांकडे जाण्याची गरज केव्हाच भासणार नाही. हवेशी संपर्क आल्यास सफरचंद काळे पडू लागते. हे टाळण्यासाठी सफरचंदाला फ्रीजमध्ये ठेवत असाल तर त्याला कागदात गुंडाळून ठेवावे.

३. कलिंगड – कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. कलिंगडाचा आकार मोठा असल्याने एकाचवेळी आपण ते खाऊ शकत नाही, म्हणून आपण त्याचा काही भाग कापून फ्रीजमध्ये ठेवतो. पण, असे केल्यास या फळातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात. व ते आरोग्याच्या दृष्टीनेही अपायकारक आहे.

४. लिची – लिचीतही पाण्याचे प्रमाण जास्त असते. लिचीला जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते आतून सडू लागते व त्यातील पोषक द्रव्येही नष्ट होतात. त्यामुळे लिचीचे सेवन त्याचवेळी बाजारातून आणून करावे.

५. आंबा – आंबा कापल्यामुळे खराब हो शकतो म्हणून आपण त्याचे काप फ्रीजमध्ये ठेवतो. परंतु असे केल्याने आंब्यातील पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स कमी होऊ लागतात. फ्रीजमध्ये ठेवलेले आंब्याचे काप खाणे आरोग्यास हानिकारक आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.