Apple Foldable iPad : ॲपल आणणार फोल्डेबल आयपॅड

डिजीटाईम्स या अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञान विषयक वेबसाईटने याविषयी बातमी दिली आहे.

50
Apple Foldable iPad : ॲपल आणणार फोल्डेबल आयपॅड
Apple Foldable iPad : ॲपल आणणार फोल्डेबल आयपॅड
  • ऋजुता लुकतुके

ॲपल कंपनी फोल्डेबल मोबाईल फोन बनवण्यात फारशी उत्सुक नव्हती. पण, आता कंपनी फोन नाही तर आपला आयपॅड फोल्डेबल बनवण्याच्या तयारीत आहे. ॲपल कंपनी आतापर्यंत फोल्डेबल मोबाईल फोनपासूनच लांबच राहिली होती. असे फोन बनवण्याचा विचारही त्यांनी कधी बोलून दाखवला नाही. पण, आता फोल्डेबल मोबाईल नाही तर फोल्डेबल आयपॅड बनवण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे आणि बाहेर आलेले अहवाल खरे असतील तर २०२४ मध्येच कंपनी अशा आयपॅडचं डिझाईन पूर्ण करू शकते आणि त्याचवर्षी आयपॅडचं उत्पादनही सुरू होऊ शकतं. (Apple Foldable iPad)

डिजीटाईम्स या अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञान विषयक वेबसाईटने याविषयी बातमी दिली आहे. कंपनीची उत्पादनं वितरित करणाऱ्या लोकांनी तशी खबर डिजीटाईम्सला दिली आहे आणि त्यानुसार, प्रायोगिक तत्त्वावर २०२४ च्या शेवटी कंपनी फोल्डेबल आयपॅडचं उत्पादन सुरू करेल असा अंदाज आहे. अर्थात. हे उत्पादन सध्या अगदीच मर्यादित स्वरुपात असेल. या बातमीनुसार, कंपनीला फोल्डेबल यंत्रांच्या बाजारपेठेत पाय रोवायचे आहेत. पण, छोट्या स्क्रीनकडे वळण्यापूर्वी त्यांना मोठ्या स्क्रीनवर प्रयोग करायचे आहेत. आणि आयपॅडवरील प्रयोग यशस्वी झाल्यावरच ते फोल्डेबल मोबाईल फोनकडे वळतील. (Apple Foldable iPad)

(हेही वाचा – Electricity News : वीज ग्राहकांना मिळणार प्रीपेड स्मार्ट मीटर)

कंपनीने फोल्डेबल आयपॅडचं डिझाईन अजून संमत केलेलं नाही, असंही या बातमीत म्हटलं आहे. फोल्डेबल फोन आणि नेहमीचे स्मार्ट फोन यासाठीचे ॲप आणि त्यांचे प्रोग्राम वेगवेगळे असतात. त्यामुळे ते नव्याने तयार करावे लागतात. त्यामुळे हा सगळा विचार करून ॲपल कंपनी या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. फोल्डेबल आयपॅड उत्पादन खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर असावेत आणि पुढे त्या तंत्रज्जानाचा उपयोग फोल्डेबल मोबाईल बनवताना व्हावा असा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. आयपॅड आणि ॲपल फोनची ऑपरेटिंग प्रणाली सारखीच आहे. त्यामुळेच आयपॅडवर केलेले प्रयोग कंपनीला आयफोनमध्येही वापरता येतील असा कंपनीचा होरा आहे. कंपनीने अलीकडे आयओएस १७ हा ऑपरेटिंग प्रणालीतील अपडेट लोकांसाटी उपलब्ध केला आहे. त्यामुळे आयफोन १५ ची बॅटरी जास्त तापत असल्याची तक्रारही कमी झाली आहे. (Apple Foldable iPad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.