IND vs WI : भारताच्या गोलंदाजांनी रचला विजयाचा पाया; वेस्ट इंडिजच्या धावांना लगाम

83

भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात जोरदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली, पण त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेलने यावेळी ३२ चेंडूंत ४८ धावांची खेळी साकारली. भारताकडून यावेळी युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. वेस्ट इंडिजने या संथ खेळपट्टीवर दमदार फलंदाजी करत भारतापुढे १५० धावांचे आव्हान ठेवले आहे.

वेस्ट इंडिने या डावाची भन्नाट सुरुवात केली. ब्रेंडन किंगने यावेळी धडाकेबाज सुरुवात केली. पण यावेळी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या युजवेंद चहलने यावेळी किंगच्या या खेळीला खीळ बसवली. कारण चहलने यावेळी आपल्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर कायले मेयर्सला बाद केले. मेयर्सला यावेळी फक्त एकच धाव करता आली. त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर पुन्हा एकदा भारतीय चेंडूवर मोठे यश मिळाले. कारण या तिसऱ्या चेंडूवर चहलने किंगला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. चहलने यावेळी पायचीत पकडले. किंगने यावेळी १९ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २९ धावांची खेळी साकारली.

(हेही वाचा Hindu God : हिंदू देवदेवतांवर वादग्रस्त विधान भोवलं; प्राध्यापकाची नोकरी गेली)

चहलने फक्त तीन चेंडूंत भारताला दोन विकेट्स मिळवून दिल्या. चहलनंतर कुलदीपने यावेळी भारताला तिसरे यश मिळवून दिले. कुलदीपने यावेळी जॉन्सन चार्ल्सला तीन धावांवर असताना तंबूत धाडले. त्यानंतर निकेल्स पुरन आणि कर्णधार रोवमन पॉवेल यांनी भारताच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. पुरन हा चांगल्या फॉर्मात होता. कारण त्याने मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीत एकहाती विजय मिळवून दिला होता. त्याचा हा फॉर्म संघासाठी चांगला ठरला. पण हार्दिक पंड्याने आपल्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पुरनला बाद केले. पुरनने यावेळी ३४ चेंडूंत २ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली. पुरन बाद झाला आणि त्यानंतर पॉवेलने धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात केली. पॉवेलला साथ द्यायला यावेळी मैदानात होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.