India vs Japan : महिला फुटबॉल संघाचा जपानकडून लाजिरवाणा पराभव

भारतीय महिला फुटबॉल संघाला जपानकडून ७-० अशा मोठा पराभवाला सामोरं जावं लागलं. ही विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी होती आणि भारताचं आव्हान आता कठीण झालंय.

92
India vs Japan : महिला फुटबॉल संघाचा जपानकडून लाजिरवाणा पराभव
India vs Japan : महिला फुटबॉल संघाचा जपानकडून लाजिरवाणा पराभव
  • ऋजुता लुकतुके

भारतीय महिला फुटबॉल संघाला जपानकडून ७-० अशा मोठा पराभवाला सामोरं जावं लागलं. ही विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी होती आणि भारताचं आव्हान आता कठीण झालंय. (India vs Japan)

एएफसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारतीय महिलांचा जपानकडून पार धुव्वा उडाला. पहिल्या हाफमध्ये जपानचं आक्रमण थोपवणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या हाफमध्ये जपानचा तडाखा रोखता आला नाही. भारताचे प्रशिक्षक थॉमस डेनर्बी यांनी सामन्यात ५-३-३ अशी व्यूहरचना केली होती आणि पहिल्या ४५ मिनिटांमध्ये ती यशस्वीही ठरली. (India vs Japan)

जपानचा संघ १-० असा किरकोळ आघाडी मिळवून होता. आशालता देवी, स्विटी देवी आणि रितू राणी या बचावपटूंनी जपानी आक्रमणाला दाद दिली नव्हती. तर मिडफिल्डर संगीता, शिल्की देवी आणि इंदुमती यांनी सुरुवातीला जपानच्या हाफमध्ये घुसण्यातही यश मिळवलं. (India vs Japan)

(हेही वाचा – Kojagiri Purnima: गप्पा, गाणी आणि हास्यजत्रेतील कलाकारांसह रसिकांनी लुटला कोजागिरीचा आनंद)

इंदुमतीने एक लांब पल्ल्याची किक मारून एक कॉर्नरही मिळवला. पण, जपानी बचावपटूंनी तो अडवला. पण, एकंदरीत भारतीय संघाने फिफा महिला क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या जपानला मध्यंतरापर्यंत चांगली लढत दिली होती. भारतीय गोली श्रेया हूडाही चांगल्या फॉर्ममध्ये होती. (India vs Japan)

पण, दुसऱ्या हाफमध्ये चित्र पूर्णपणे पालटलं. जपानने दोन्ही बगलेतून एकामागून एक चाली रचल्या. आणि त्यांचा नेमही अचूक होता. त्या जोरावर मध्यंतरा नंतरच्या ११ मिनिटांतच त्यांनी ४ गोल डागले. तिथून भारतीय संघ सावरूच शकला नाही. जपानसाठी योशिनो नाकाशिमाने दोन गोल केले. तर हिकारू नाओमोटोनेही दोन गोल करून तिला चांगली साथ दिली. भारतीय संघासाठी आता पात्रता स्पर्धेतील आव्हान बिकट झालं आहे. (India vs Japan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.