Kojagiri Purnima: गप्पा, गाणी आणि हास्यजत्रेतील कलाकारांसह रसिकांनी लुटला कोजागिरीचा आनंद

19
Kojagiri Purnima: गप्पा, गाणी आणि हास्यजत्रेतील कलाकारांसह रसिकांनी लुटला कोजागिरीचा आनंद
Kojagiri Purnima: गप्पा, गाणी आणि हास्यजत्रेतील कलाकारांसह रसिकांनी लुटला कोजागिरीचा आनंद

चंद्राच्या शीतल प्रकाशात, चमचमत्या चांदण्यांसह गाणी, अंताक्षरी आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकारांशी गप्पांनी नटलेली धमाल सायंकाळ अनुभवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त (Kojagiri Purnima) दादर सांस्कृतिक मंचाच्या वतीने ‘चंद्र आहे साक्षीला’ हा विशेष कार्यक्रम सादर झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी-हिंदी नव्या-जुन्या गाण्यांचा मनमुराद आनंद यावेळी रसिकांनी घेतला.

यावेळी गायक प्रवीण देहेरकर आणि गायिका अलिशा देसाई यांनी मराठी आणि हिंदी भाषेतील गीते सादर केली, तर निवेदिका संजना पाटील हिने लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे तसेच ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, वनिता खरात हे कलाकार तसेच हास्यजत्राचे निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्याशी संवाद साधला.

(हेही वाचा – Amrit Kalash Yatra : ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातून अमृत कलश यात्रा दिल्लीत दाखल )

दादरचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी ‘दादर सांस्कृतिक मंच’ गेली ७ वर्षे विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत आहे.

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.