T20 World Cup : सेमीफायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचे आव्हान; पण टीम इंडियाचे यामुळे वाढलंय टेन्शन

106

टी-२० विश्वचषकात आतापर्यंत भारताने चांगली कामगिरी करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये आपल्या टीम इंडियासमोर बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असणार आहे. टीम इंडिया सध्या सर्वाधिक गुणांसह मजबूत स्थितीत आहे. परंतु सध्या भारतीय संघासमोर टेन्शन वाढवणारी काय आव्हाने आहेत याविषयी आपण जाणून घेऊया…

( हेही वाचा : १८ हजार पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; नियमांमध्ये महत्त्वाचे बदल!)

सलामी जोडी चिंतेचे कारण…

भारताने आतापर्यंतच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली असली तरी, संपूर्ण स्पर्धेत भारताची सलामी जोडीने आतापर्यंत दमदार भागिदारी केलेली नाही. रोहित शर्माने आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये केवळ ८९ धावा केल्या आहेत. तसेच सराव सत्रात त्याला दुखापत झाल्याचेही समोर आले आहे त्यामुळे एकंदर रोहित शर्मा खेळणार की नाही आणि त्याचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे.

पॉवर प्लेचा फायदा घेतलेला नाही

भारतीय संघाला आतापर्यंत पॉवर प्लेचा फायदा घेता आलेला नाही. ओपनिंग जोडी लवकर बाद झाल्याने मधल्या फळीतील खेळाडूंवर दबाव वाढतो आणि पॉवर प्लेमध्ये अधिक संथ खेळावे लागते, परिणामी दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये धावा काहीही करून कराव्याचं लागतील अशी स्थिती निर्माण होते. इंग्लंडचे सर्व गोलंदाज चांगले असल्याने भारताने विशेष लक्ष देऊन खेळणे आवश्यक आहे.

फिरकी गोलंदाज

वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीपला सुरूवातीच्या षटकांमध्ये विकेट मिळतात. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर सुद्धा अर्शदीपला साथ देत आहेत. परंतु भारतासमोर फिरकी गोलांदाजीचे सर्वात मोठे टेन्शन आहे. अक्षर पटेल आणि आर.अश्विन हे दोन्ही गोलंदाज एकाच षटकात धावाही जास्त देत आहेत. चहलला अजून संधी मिळाली नाही. त्यामुळे गोलंदाजी सुद्धा भारतासाठी टेन्शन असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.