Ind vs SA 3rd ODI : केशव महाराज आणि के एल राहुल यांनी खरंच ‘जय सियाराम’चा घोष केला का?

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात राहुल आणि केशव महाराज यांच्यातील संवाद स्टंप व्हिजन कॅमेराने टिपला आहे. 

172
Ind vs SA 3rd ODI : केशव महाराज आणि के एल राहुल यांनी खरंच ‘जय सियाराम’चा घोष केला का?
Ind vs SA 3rd ODI : केशव महाराज आणि के एल राहुल यांनी खरंच ‘जय सियाराम’चा घोष केला का?
  • ऋजुता लुकतुके

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात राहुल आणि केशव महाराज यांच्यातील संवाद स्टंप व्हिजन कॅमेराने टिपला आहे. (Ind vs SA 3rd ODI)

संजू सॅमसनच्या अप्रतिम शतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-१ ने जिंकली. तिसऱ्या सामन्यात संजूने ११४ चेंडूत १०८ धावा केल्या आणि त्या जोरावर भारताने ८ बाद २९६ अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर अर्शदीपने घेतलेल्या ४ बळींच्या जोरावर आफ्रिकन संघाला २१८ धावांत रोखत भारतीय संघाने ७८ धावांनी विजयही मिळवला. (Ind vs SA 3rd ODI)

(हेही वाचा – Ind vs SA 3rd ODI : साई सुदर्शन भारताचा मालिकेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक)

पण, या सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला, जो स्टंप व्हिजन कॅमेराने टिपला आहे आणि सध्या व्हायरल होतो आहे. आफ्रिकन डावाच्या ३३ व्या षटकात केशव महाराज फलंदाजीसाठी आला आणि स्टेडिअममधील डिजेनं नेमकं राम सियाराम, जय जय राम सियाराम हे गाणं लावलं. (Ind vs SA 3rd ODI)

(हेही वाचा – India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये २६ डिसेंबरपासून २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार)

राहुलने गंमतीने केशवला म्हटलं, ‘केशवभाई, तुम्ही मैदानात आलात की न चुकता ते राम सियाराम गाणं लावतात.’ त्यावर महाराजनेही राहुलला हो, असं म्हणत संमती दिली. (Ind vs SA 3rd ODI)

एकदिवसीय मालिकेनंतर आता दोन्ही संघ २ कसोटींमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. कसोटी मालिकेतही राहुलच यष्टीरक्षण करेल अशी दाट शक्यता आहे. (Ind vs SA 3rd ODI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.