Muslim : मुस्लिम तरुणी सनाने विवाह केला दिनेशसोबत; तरुणीच्या कुटुंबाकडून धमक्या; तरुणीने थेट मुख्यमंत्री योगींकडे मागितली मदत

180
उत्तर प्रदेशातील प्रतापगड माणिकपूर येथे राहणारी मुस्लिम (Muslim) तरुणी सना हिने हिंदू तरुण दिनेशसोबत प्रेम विवाह करून हिंदू धर्म स्वीकारला आणि सरिता झाली. मात्र या विवाहामुळे तरुणीच्या कुटुंबियाने या दाम्पत्यांना धमकावणे सुरु केले आहे. ज्यामुळे आता तरुणीने थेट मुख्यमंत्री योगी यांच्याकडेच मदत मागितली आहे.

सनाला दिनेशच्या कुटुंबियाने स्वीकारले 

सना आणि दिनेश यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांची कुणकुण मुस्लिम (Muslim) तरुणी सनाच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी दिनेशला मारहाण केली होती. मात्र तरीही दोघांनी माघार घेतली नाही, त्यांनी कोर्टात जाऊन विवाह केला. तसेच सनाने धर्म बदलून हिंदू धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव सरिता असे केले. मात्र सनाच्या कुटुंबाकडून सनाला धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे ते दोघे जण मागील सहा महिन्यांपासून दिल्लीत राहत आहेत. सना तिच्या गावात परतण्यास घाबरत आहे. अखेर सना उर्फ सरिता हिने उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी यांना मदतीसाठी विनंती केली आहे. माझ्या आणि माझ्या पतीच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला मदत करावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे सना उर्फ सरिता हिला दिनेशच्या कुटुंबीयांनी स्वीकारले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.