IND vs SA 1st T 20 : पहिला सामना पावसाने जिंकला; नाणेफेकही न होता सामना रद्द

आता दुसरा टी-20 सामना १२ डिसेंबर, तिसरा टी-20 सामना १४ डिसेंबरला होणार आहे. तर १७ डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे.

146
IND vs SA 1st T 20 : पहिला सामना पावसाने जिंकला; नाणेफेकही न होता सामना रद्द

भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका भारताने आपल्या नावावर केल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध (IND vs SA 1st T 20) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र पावसाने या उत्साहावर पाणी फेरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच टी २० सामना पावसामुळे रद्द झाला.

डरबन येथे मुसळधार पावसामुळे पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय (IND vs SA 1st T 20) सामना रद्द करावा लागला. त्यामुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाच्या नियमांनुसार त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहिली, परंतु पाऊस थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नव्हते आणि शेवटी क्रिकेट प्रशासनाने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा – Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा मुद्दा गाजणार ?)

भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA 1st T 20) यांच्यातील पहिला टी-20 सामना हा १० डिसेंबरला डर्बनमध्ये होणार होता. मात्र पावसामुळे तो रद्द करावा लागला. त्यानंतर आता दुसरा टी-20 सामना १२ डिसेंबर, तिसरा T-20 सामना १४ डिसेंबरला होणार आहे. तर १७ डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. हा सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. यानंतर दुसरी वनडे मॅच १९ डिसेंबरला तर तिसरा सामना सामना २१ डिसेंबरला होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना हा २६ डिसेंबरपासून तर दुसरा सामना ३ जानेवारीपासून होणार आहे. (IND vs SA 1st T 20)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.