Ind vs Pak : पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफही भारत – पाक सामन्यासाठी अहमदाबादेत येणार 

भारत - पाक सामन्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफही भारतात येणार आहेत. अलीकडेच भारतीय प्रशासन पाक खेळाडू आणि चाहत्यांना वेळेत व्हिसा देत नसल्याची तक्रार त्यांनी आयसीसीकडे केली होती. त्यामुळे ते चर्चेत होते 

56
Ind vs Pak : पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफही भारत - पाक सामन्यासाठी अहमदाबादेत येणार 
Ind vs Pak : पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफही भारत - पाक सामन्यासाठी अहमदाबादेत येणार 

ऋजुता लुकतुके

भारत वि पाकिस्तान (Ind vs Pak) सामन्याचा ज्वर दोन्ही देशात आता सारखाच पसरलेला दिसतो. पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफही या सामन्यासाठी गुरुवारी उशिरा अहमदाबादला पोहोचणार आहेत. पाकिस्तानच्या ६० पत्रकारांनी या सामन्याच्या वार्तांकनासाठी भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. आणि आता व्हिसा स्टँपिंगसाठी या पत्रकारांना आपले पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आलं आहे.

पाक पत्रकारांना व्हिसा मिळाल्याचं बघून मग आपण भारतात येणार असल्याचं अश्रफ यांनी म्हटलं आहे. पाक क्रिकेट बोर्डाकडून एक अधिकृत पत्रकच जारी करण्यात आलं आहे. ‘मी माझं भारतात जाणं पुढे ढकललं आहे. जोपर्यंत पाक पत्रकारांना भारताचा व्हिसा मिळत नाही, तोपर्यंत मी देश सोडणार नाही, असं मी ठरवलंय,’ असं या पत्रकात अश्रफ म्हणाले होते.

(हेही वाचा-Khalistani Terrorist : इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानी दहशतवादी पन्नूनची भारताला धमकी; व्हिडीओ वायरल)

पाकिस्तानी नागरिकांना भारतीय (Ind vs Pak) व्हिसा मिळवण्यासाठी क्रीडा मंत्रालयाबरोबरच भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचीही मान्यता लागते. या तीनही खात्यांनी होकार दिल्यावर पाक पत्रकारांना स्पर्धेच्या वार्तांकनासाठी व्हिसा मिळू शकतो. ही प्रक्रिया लांबल्याची तक्रार पाक बोर्डाने वेळोवेळी केली होती.

अश्रफ यांनी आयसीसी बरोबरच पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयालाही हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. आता व्हिसा मिळाल्यानंतर चर्चा पुन्हा क्रिकेट भोवती आली आली आहे. अश्रफ यांनीही संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतात येत असल्याचं म्हटलंय. ‘आतापर्यंत पाक संघाने ज्याप्रकारे खेळ केलाय त्याबद्दल मी समाधानी आहे. पहिले दोनही विजय नेत्रदीपक होते. आता भारता विरुद्धही असाच बेडर खेळ करा, असं माझं संघाला सांगणं असेल,  असं ते म्हणाले.’

पाक बोर्ड आणि पाकची जनता खेळाडूंच्या पाठीशी आहे. त्यांच्या वतीने संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण भारतात जात आहोत. आता संघाने न घाबरता खेळ करावा, असं शेवटी त्यांनी पाक संघाला उद्देशून म्हटलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.