Ind vs Eng 3rd Test : ‘ही’ कामगिरी करणारा सर्फराझ खान चौथा भारतीय फलंदाज

सर्फराझ खानचं कसोटी पदार्पण त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी यादगार ठरलं. 

185
Sarfaraz Khan : मुंबईकर सर्फराझ खानने फिरकीवर हुकुमत कशी मिळवली?
  • ऋजुता लुकतुके

मुंबईचा तडाखेबाज फलंदाज सर्फराझ खानने (Sarfaraz Khan) राजकोट कसोटीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं. आणि त्याचबरोबर आपल्या कामगिरीने तो भारतातील दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा तो फक्त चौथा भारतीय फलंदाज आहे. फिरकी गोलंदाजी खेळण्यात माहीर असलेल्या सर्फराझने (Sarfaraz Khan) पहिल्या डावात ६२ चेंडूंत ६८ धावा केल्या. यात त्याने ९ चौकार आणि १ षटकार लगावला. दुसऱ्या बाजूने खेळणाऱ्या रवी जाडेजाचं शतक पूर्ण व्हावं यासाठी चोरटी धाव घेताना तो हकनाक धावचीत झाला. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Shiv Jayanti 2024 : गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

या दोघांनी भारताला गाठून दिला चारशेचा टप्पा

तर दुसऱ्या डावांत ७२ चेंडूंत त्याने नाबाद ६८ धावा केल्या. दिलावर हुसेन हे पदार्पणाच्या कसोटींत दोन अर्धशतकं झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज आहेत. इंग्लंड विरुद्ध १९३४ च्या कोलकाता कसोटींत त्यांनी ही कामगिरी केली होती. आणि त्यानंतरची नावं आहेत साक्षात सुनील गावसकर आणि श्रेयस अय्यर. पैकी एकट्या सुनील गावसकर यांनी ही कामगिरी परदेशी खेळपट्टीवर केली आहे. गावसकर यांनी पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत बलाढ्य वेस्ट इंडिज विरुद्ध ६५ आणि नाबाद ६७ धावांची खेळी केली होती. (Ind vs Eng 3rd Test)

सर्फराझने (Sarfaraz Khan) दुसऱ्या डावांत यशस्वी जयस्वाल बरोबर नाबाद १७२ धावांची भागिदारीही केली. दोघांनी १५८ चेंडूंतच दीडशतकी भागिदारी रचली. आणि भारताला चारशेचा टप्पा गाठून दिला. (Ind vs Eng 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.